पाण्याच्या तीव्र समस्येवर पाणी बचत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी : उदय गायकवाड
पाण्याच्या तीव्र समस्येवर पाणी बचत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी : उदय गायकवाड
'महाराष्ट्रासमोर स़ध्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. भविष्यातदेखील उभ्या राहणार्या पाण्याच्या तीव्र समस्येवर पाणी बचत करण्याची प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक जबाबदारी आहे' असे मत पर्यावरण कार्यकर्ते श्री.उदय गायकवाड यांनी व्यक्त केले. सावली केअर सेंटर,पीरवाडी ता.करवीर यांच्या- वतीने व उदय गायकवाड यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या जलसंवाद सभेमध्येश्री.गायकवाड बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावली केअर सेंटरचे डॉ. किशोर देशपांडे होते. या सभेमध्ये कोल्हापु- रातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थेतील पस्तीसहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
डाँ. किशोर देशपांडे यांनी जल संकटाचे गांभीर्य ओळखून समाज घटकांनी कृतीशील होण्याची गरज आहे .पाणी बचती बाबतचा संदेश समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यकता बोलून दाखवली .
सभेत काय ठरले?
दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर किती असावा? याबाबत नियम ठरवून योग्य ती कार्यप्रणाली आखणे
भूजल पातळी वाढव- ण्यासाठी शाश्वत नियोजन करणे.
पाण्याचा अपव्यय टाळून जल संवर्धनाचे विविध उपक्रम हाती घेणे. पाणी बचती बाबत समाजात जनजागृती करणे.
पाण्याच्या ज्वलंत प्रश्नावर केवळ चर्चा न करता त्यावर प्रत्यक्ष कार्यप्रणाली ठरवून प्रत्येक समाज घटकासाठी पाणी वापरा संबंधी आचारसंहितेचे मुद्दे मांडण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात व्यापक पाणी परिषद घेण्याचा निर्धारदेखील व्यक्त करण्यात आला. यासाठी समाजातील विविध घटकांपुढे पाणी बचती संबंधी मार्गदर्शन बैठका घेण्याचे निश्चित झाले
या सभेत जिल्ह्यातील उद्योजक, शेतकरी, व्यापारी स्वयंसेवी संस्था ,शासकीय अधिकारी, शिक्षक जेष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती
सभेस सुरेश शिपुरकर,जय सामंत ,अनुराधा सामंत ,शेखर फडणीस ,विदुला स्वामी ,श्रद्धा शिंत्रे ,उज्वला नागेशकर, अनिल चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------------------

No comments: