Header Ads

नेलकरंजीतील जकाई देवीचे चांदीचे दागिने चोरीप्रकरण उघड; सात जणांना अटक, ९.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

 नेलकरंजीतील जकाई देवीचे चांदीचे दागिने चोरीप्रकरण उघड; सात जणांना अटक, ९.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

आटपाडी पोलिसांच्या मदतीने सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; तिघे फरार..



सांगली : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे बंद घराचे कुलूप तोडून जकाई देवीचे चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून, तिघे फरार आहेत.

२९ ऑक्टोबर रोजी सांगली-कोल्हापूर मार्गावरील वुडलँड हॉटेलच्या पाठीमागे झुलेलाल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान मोटारसायकलवरील पिशवीत ४ किलो २४३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आढळले.

२४३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आढळले.

चौकशीत या टोळीने नेलकरंजी येथील बंद घराचे कुलूप तोडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान करत चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी ८ लाख ४९ हजार ४०० रुपयांचे चांदीचे दागिने, ४० हजारांची हिरो सीडी डिलक्स मोटारसायकल आणि ५० हजारांची टीव्हीएस ज्युपिटर मोपेड, असा एकूण ९ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने केली.

ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, फरार तिघांचा शोध सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.