राधानगरी धरण 61 टक्के भरले.

राधानगरी धरण 61 टक्के भरले. ----------------------------------- राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे ----------------------------------- राधानगरी धरण सततदार पावसामुळे 61% भरले असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने धरण परिसरात आज सकाळी सहा वाजेपर्यंत 116 मिलिमीटर पाऊस झाला असून धरणाची पाणी पातळी 326.60 मिलिमीटर इतके आहे तर पाणीसाठा 5.11 tmc इतका आहे तर एक जून ते 21 जून अखेर 796 मिलिमीटर पाऊस झाला असून धरण 61.20% भरले असून धरण भरण्यास 20 फूट कमी असल्या ची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली तसेच बीओटी मधून 1600 क्यू शेक तर सेवा द्वारे 1500 क्यू सेक असा एकूण 3100 क्यूशे क पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सोडण्यात आले असल्याने भोगावती नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असे आव्हान भोगावती पाटबंधारे खात्याकडून करण्यात आले