देशातला पहिला सहकारी तत्त्वावर प्रकल्प करण्याचा मान वारणेला मिळाला.
देशातला पहिला सहकारी तत्त्वावर प्रकल्प करण्याचा मान वारणेला मिळाला.
--------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
-------------------------------------
मुंबई (विधान भवन) येथे जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन- आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था, वारणानगर यांच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला...* 🔰
*यापूर्वी राज्य शासनामार्फत 15 अभिकरणासमवेत करार झाले असून, हा 16 वा करार 240 मेगावॅट क्षमतेच्या प्रस्तावित तिलारी उपसा जलविद्युत प्रकल्पासाठी करण्यात आला असून, याद्वारे महाराष्ट्राच्या नवीकरणीय ऊर्जा अभियानाला अधिक गती येईल...*
*अक्षय ऊर्जा स्रोतांची वाढती अविश्वसनीयता ही एक मोठी समस्या आहे आणि उपसा जलविद्युत प्रकल्प (PSPs) हे ऊर्जा साठवणुकीसाठी एक सिद्ध आणि किफायतशीर तंत्रज्ञान म्हणून ग्रीडची स्थिरता आणि विश्वासार्हता वाढवतात. महाराष्ट्र शासनाचे PSP धोरण सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत प्रकल्पांना प्रोत्साहन दिल्याचे नमूद करून राज्य शासनाचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी आभार मानले...*
*हा प्रस्तावित प्रकल्प केवळ ऊर्जा क्षेत्रातच नाही, तर सामाजिक आणि आर्थिक स्तरावरही महाराष्ट्रासाठी मोठे लाभ घेऊन येईल. या प्रकल्पाचे सर्वात अभिनव वैशिष्ट्य म्हणजे अप्पर जलाशयात पाणी उपसण्यासाठी आवश्यक असलेली वार्षिक ऊर्जा सहस्थित फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्पातून पुरविली जाईल व यामुळे वर्षाला 5 लक्ष् टन CO₂ उत्सर्जन टाळण्यास मदत होईल , जे 4.5 लाख वाहनांच्या वार्षिक CO₂ उत्सर्जनाइतके आहे...*
*वारणा नवशक्ती निर्माण संस्था ही सध्या ४ जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करून यशस्वीरीत्या चालवणारी एक संस्था आहे. वारणा समुहातील वारणा साखर कारखाना,वारणा दूध संघ व इतर संस्था मिळून निर्माण केलेली ही संस्था आहे. या संस्थेचे चेअरमन एन.एच.पाटील (सर) आहेत.सहकारातील पहिला मान पुन्हा वारणेने मिळवला यांचा आनंद असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी सांगितले...*
*वारणा समुहाने दूध, साखर, शिक्षण आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये तसेच सध्याच्या त्यांच्या कॅप्टिव्ह ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. वारणा समुह हा २४० मेगावॅटचा उपसा जलविद्युत प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करेल तसेच हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यात आणि शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला...*
*यावेळी जलसंपदा मंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील,जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री.दिपक कपूर,जलसंपदा विभागाचे सचिव श्री.संजय बेलसरे,श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्थेचे अध्यक्ष श्री.एन.एच.पाटील (सर),कु.ज्योतिरादित्य विनय कोरे,मर्काडोस एनर्जी मार्केट्स इंडिया लिमिटेडचे संचालक श्री.चंद्रराव मोरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment