Header Ads

खामुंडीमध्ये 'उमेद' अंतर्गत चार व्यवसाय प्रकल्पांचे थाटात उद्घाटन; महिला सक्षमीकरणाला बळ.

 खामुंडीमध्ये 'उमेद' अंतर्गत चार व्यवसाय प्रकल्पांचे थाटात उद्घाटन; महिला सक्षमीकरणाला बळ.



आळेफाटा (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 'उमेद' व एकात्मिक शेती विकास विभाग प्रकल्प  अंतर्गत खामुंडी(ता. जुन्नर )ग्रामपंचायत येथे चार नवीन व्यवसाय प्रकल्पांचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले.

ओतूर पिंपरी पेंढार प्रभागातील खामुंडी येथील स्वामिनी महिला ग्रामसंघातील बचत गटांतील महिलांनी एकत्रित येऊन हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये धान्य खरेदी व विक्री केंद्र, रोपवाटिका, अंडी संकलन केंद्र आणि मांस विक्री केंद्र या चार व्यवसायांचा समावेश आहे.

स्वामिनी महिला ग्रामसंघाने सुरू केलेल्या धान्य खरेदी-विक्री केंद्रातून गावातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून उच्च प्रतीचे धान्य, सोयाबीन, डाळी यांसारखा शेतमाल थेट खरेदी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव देण्याचा मानस आहे. हा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

हा प्रकल्प उमेद, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे.

या उद्घाटन सोहळ्यास व्यावसायिक उल्हास शिंगोटे, प्रसिद्ध पोल्ट्री उद्योजक विजय चव्हाण, व्यावसायिक हेमंत सोनवणे, अमोल हांडे, पंचायत समिती जुन्नरचे तालुका अभियान व्यवस्थापक नितीन काळे, प्रभाग समन्वयक रवींद्र आल्हाट, सोनल वायकर, ग्रामसंघ अध्यक्ष कल्पना शिंगोटे, सचिव मयुरी हांडे,अर्चना शिंगोटे, ग्रामसखी मनिषा जगताप, रोहिणी ठिकेकर, कविता चौधरी यांच्यासह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी विजय चव्हाण यांनी महिलांना धान्य खरेदी-विक्री, साठवणूक आणि मार्केटिंग बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार कल्पना शिंगोटे यांनी मानले.

No comments:

Powered by Blogger.