Header Ads

दिवाळीत गांधीनगर बाजारपेठेत भारनियमन नको; शिवसेनेचा महावितरणला इशारा!

 दिवाळीत गांधीनगर बाजारपेठेत भारनियमन नको; शिवसेनेचा महावितरणला इशारा!

वीज खंडित झाल्यास ढोल वाजवून अधिकाऱ्यांना जागे करणार – राजू यादव.


गांधीनगर | प्रतिनिधी

दिवाळीच्या सणात गांधीनगर बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महावितरणकडे केली आहे. वीज खंडित झाल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान होण्यासह चोरी व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे शिवसेनेने म्हटले आहे.

बाजारपेठेतील अतिरिक्त विद्युत भार असलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

“दिवाळीत वारंवार वीज खंडित झाल्यास अधिकाऱ्यांना ढोल वाजवून जागे करण्याचे आंदोलन करू,” असा इशारा करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला.

शिवसेना शिष्टमंडळाने महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन रामचंद्र वीर यांना निवेदन दिले. बाजारपेठेत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून अखंडित वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.