Header Ads

सोलापुरात थार चोरट्यास सातारा पोलिसांनी केले जेरबंद

 सोलापुरात थार चोरट्यास सातारा पोलिसांनी केले जेरबंद

सातारा : महिंद्रा कंपनीची थार चारचाकी खरेदी करण्याच्या बहाण्याने टेस्ट ड्राईव्हसाठी वाहन घेऊन पसार होणाऱ्या सराईत आरोपी सोहेल अफजल बागवान वय वर्षे 28 मूळ गाव जुनी पेठ पंढरपूर सध्या जामखंडी पुल बुधवार पेठ सोलापूर, ह्यास सातारा शहर पोलिसांच्या डी बी पथकाणे सोलापूरमध्ये या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळल्या त्याच्या ताब्यातुन 32 लाख रुपये किंमतीच्या 2 थार जप्त करण्यात आल्या. ह्या कारवाईमुळे सातारा शहर व चाकण पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 5 जुलै 2026 रोजी सातारा शहरातील महिंद्रा शोरूममध्ये आलेल्या एका व्यक्तीने थार वाहन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करत टेस्ट ड्राईव्हसाठी वाहन ताब्यात घेतले. मात्र, वाहन परत न करता  तो थेथुन वाहणासह पसार झाला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना डी.बी. पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख निश्चित केली. आरोपी वाहन घेऊन पुण्याच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याचा शोध घेत सोलापूर शहरातून त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी करता 

 आरोपीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातही अशाच पद्धतीने थार वाहनाची फसवणूक केल्याची कबुली दिली.

 सदरची कारवाई 

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकातील अधिकारी-अंमलदार तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली.

दरम्यान, वाहन खरेदी-विक्री करताना संबंधित व्यक्तीची ओळख आणि कागदपत्रांची खातरजमा करावी तसेच संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सातारा शहर पोलिसांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.