Header Ads

१ कोटी मतांची ताकद सरकारला दाखविण्याची वेळ आली' — अभिजीत दिपके यांचा इशारा

 '१ कोटी मतांची ताकद सरकारला दाखविण्याची वेळ आली' — अभिजीत दिपके यांचा इशारा

अमरावती | प्रतिनिधी : पी. एन. देशमुख

अमरावतीतील श्री गाडगेबाबा समाधी मंदिर परिसरात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो तरुण-तरुणींशी संवाद साधताना अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधत, "आता सरकारला १ कोटी मतांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे," असे वक्तव्य केले.

बातमीतील महत्त्वाचे मुद्दे

राज्यातील सुमारे १५ ते २० लाख स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा प्रश्न असल्याचा दावा.

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ओळखपत्र (कार्ड) देण्याची मागणी.

MPSC परीक्षेतील पर्यायी प्रश्नपत्रिका कायम ठेवावी आणि परीक्षा वेळेत घ्याव्यात, अशी मागणी.

पोलीस भरतीतील सुविधा अभावामुळे होणारा त्रास थांबवावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी.

लोकप्रतिनिधींसाठी किमान शैक्षणिक पात्रता बंधनकारक करण्याचीही मागणी विद्यार्थ्यांनी मांडली.

विद्यार्थ्यांनी स्वतःचे नेतृत्व तयार करून संघटित आंदोलन उभारण्याचे आवाहन दिपके यांनी केले.

संवाद कार्यक्रमात औपचारिक व्यासपीठ नव्हते. हजारो विद्यार्थी जमिनीवर वर्तुळाकार बसले होते आणि त्यांच्या मध्यभागी उभे राहून अभिजीत दिपके यांनी थेट संवाद साधला.

No comments:

Powered by Blogger.