मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघात डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती साजरी व अभियंता दिन साजरा.
मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघात डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती साजरी व अभियंता दिन साजरा.
------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
------------------------------
येथील ज्येष्ठ नागरिक संघात डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती व अभियंता दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभियंता शाहू फर्नांडिस होते .
यावेळी डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन शाहू फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी शाहू फर्नांडिस ,पी जी चौगले , श्रीपतराव खराडे, जयकुमार गुजर, संभाजी आंगज , सुधीर गुजर, बाळासो सुर्यवंशी , प्रकाश पोतदार , ईस्माईल नायकवडी, सदाशिव एकल , महादेव वागवेकर या अभियंत्यांचे गुलाब पुष्प पेढा भरवून स्वागत करण्यात आले .
यावेळी अभियंता प्रा.संभाजीराव आंगज यांनी डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या कारकिर्दीतील अनेक यशस्वी घटनांना उजाळा दिला . यावेळी अभियंता शाहू फर्नांडिस,पी जी चौगले , श्रीपतराव खराडे, जयकुमार गुजर, मनोज सासणे यांनीही अनेक उदाहरणे देत डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभिवादन केले .
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष पी डी मगदूम, सचिव सखाराम सावर्डेकर, खजिनदार शिवाजी सातवेकर , अशोक डवरी ,एम टी सामंत यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक , सदस्य उपस्थित होते . कार्यक्रमात अभियंता सदाशिवराव एकल यांनी स्वागत केले .
प्रास्ताविक जयवंत हावळ यांनी केले . तर
आभार महादेव कानकेकर यांनी मानले केले .

No comments: