ओलवनमध्ये भक्तिमय वातावरणात दीड दिवसाच्या गणरायाला निरोप; नदीकिनारी "गणपती बाप्पा मोरया"चा जयघोष.
ओलवनमध्ये भक्तिमय वातावरणात दीड दिवसाच्या गणरायाला निरोप; नदीकिनारी "गणपती बाप्पा मोरया"चा जयघोष.
-----------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------
राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य परिसरातील ओलवन गावात दीड दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. "गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या" अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
गावातील भाविकांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या वातावरणात श्री गणेशाची मिरवणूक काढली. त्यानंतर नदीकाठी विधीवत पूजा-अर्चा करून बाप्पाला भावपूर्ण निरोप देत नदीमध्ये विसर्जन करण्यात आले.
दाजीपूर अभयारण्याच्या निसर्गरम्य परिसरात झालेल्या या विसर्जन सोहळ्याला ग्रामस्थ, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग नोंदवला. उत्साह, श्रद्धा आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम या विसर्जन सोहळ्यात पाहायला मिळाला.

No comments: