आर. के. नगर–मोरेवाडी परिसरात करवीर पोलिसांची धडक नाकाबंदी; ४० जणांवर कारवाई, ३० हजारांचा दंड
आर. के. नगर–मोरेवाडी परिसरात करवीर पोलिसांची धडक नाकाबंदी; ४० जणांवर कारवाई, ३० हजारांचा दंड.
शशिकांत कुंभार.
-----------------------------------
कोल्हापूर :-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक शिस्त कायम ठेवण्यासाठी करवीर पोलीस ठाण्याच्या वतीने आज आर. के. नगर व मोरेवाडी परिसरात अचानक नाकाबंदी करण्यात आली. या कारवाईत हुल्लडबाजी करणारे दुचाकीस्वार तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुण व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तब्बल ४० जणांवर कारवाई करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान विनापरवाना वाहन चालवणे, विना नंबर प्लेट वाहन चालवणे आणि ट्रिपल सीट अशा विविध वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक कलमकर, PSI प्रवीण पाटील आणि PSI दीपक टिपूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईमध्ये पोलीस शिपाई क्र. २४५० मुंडे तसेच होमगार्ड क्र. ४९० नलवडे, ९८२ सूर्यवंशी, ५६१ कोरोसी, ११२१ बेरकल, १७३१ पाटील आणि १३३७ चाबूक यांनी सहभाग घेतला.
करवीर पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून केलेल्या या कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच धडा मिळाला आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या या पुढाकाराचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
वाहतूक नियमांचे पालन करावे, विनापरवाना वाहन चालवू नये, ट्रिपल सीट प्रवास टाळावा आणि वाहनांवर नंबर प्लेट असणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

No comments: