मायक्रो फायनान्स कंपनी चे हप्ते स्थगित करण्यासाठी महिला बचत गटाचे राज्यमंत्री यांना निवेदन
मायक्रो फायनान्स कंपनी चे हप्ते स्थगित करण्यासाठी महिला बचत गटाचे राज्यमंत्री यांना निवेदन.
पुसद तालुका प्रतिनिधी.
्पुसद शहर व तालुक्यातील महिला बचत गटांना मायक्रो फाय कंपन्यांच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तीन महिन्याची मुददत वाढ देण्याबाबत तसेच सक्तीच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यासाठी संबंधित प्रशासन व कंपन्यांकडे पाठपुरावा करण्याबाबत निवेदन
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती, शेतीतील आर्थिक नुकसान, रोजगाराच्या अपुऱ्या संधी आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवन अत्यंत कठीण झाले आहे.
पुसद शहर व तालुक्यातील अनेक महिलांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, लहान व्यवसाय तसेच घरगुती गरजा भागविण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलेले आहे. तसेच अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून कर्ज व्यवहार सुरू आहेत.
परंतु सध्याच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे महिलांना नियमित कर्जाचे हप्ते भरणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत काही ठिकाणी कर्जवसुलीसाठी महिलांवर तगादा लावला जात असल्याने महिलांना मानसिक त्रास व आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
महिलांची ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासकीय स्तरावर पुढाकार घेऊन त्यांना दिलासा मिळवून द्यावा, या आशयाचे निवेदन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना देण्यात आले
त्यांच्या प्रमुख मागण्या :
१ पुसद शहर व तालुक्यातील सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांना महिला बचत गटांच्या कर्जहप्त्यांसाठी किमान २ ते ३ महिन्यांची मुदतवाढ व सिबिल ला धक्का न लावता देण्याबाबत शिफारस करावी.
२. संबंधित कंपन्यांनी या कालावधीत सक्तीची वसुली व महिलांवर मानसिक दबाव टाकणे टाळावे, यासाठी योग्य ती कार्यवाही करावी.
३ महिला बचत गटांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून कर्जहप्त्यांचे पुनर्नियोजन व सवलती देण्याबाबत संबंधित कंपन्यांची बैठक आयोजित करावी तसेच कर्जदार महिला मंडळातर्फे महिलांची सक्षम बाजू मांडावी अशी मागणी जागो भिम सैनिक मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ धिरे व संभाजी नगर येथील महिला बचत गट यांनी केली यावेळी महिला बचत गटाच्या बऱ्याच महिला हजर होत्या .

No comments: