Header Ads

दत्तवाड परिसरातील अतिक्रमणांवर पडणार हातोडा! सार्वजनिक बांधकाम विभागाचा इशारा.

 दत्तवाड परिसरातील अतिक्रमणांवर पडणार हातोडा! सार्वजनिक बांधकाम विभागाचा इशारा.

दत्तवाड - प्रतिनिधी (श्री.अर्जुन धोंडीराम धुमाळे)

दत्तवाड येथील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, अतिक्रमण हटविण्याच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरातील शासकीय जागा, सार्वजनिक रस्ते तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांबाबत प्रशासनाकडून लवकरच पावले उचलली जाण्याची चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील अतिक्रमणाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, संबंधित ठिकाणांची पाहणी किंवा पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दत्तवाड या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे आसपासच्या खेडेगावातील नागरिक खरेदीसाठी येथे येतात. शासकीय बँका, पतसंस्था, ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांची मोठी वर्दळ पहावयास मिळते, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक रस्ते मोकळे राहावेत, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, याबाबत उत्सुकता कायम आहे. प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे आता दत्तवाडकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.