Header Ads

वडीलांची मान शरमेनं खाली जाऊ देऊ नका– श्री. वसंत हंकारे

 वडीलांची मान शरमेनं खाली जाऊ देऊ नका– श्री. वसंत हंकारे


दत्तवाड प्रतिनिधी :(श्री.अर्जुन धोंडीराम धुमाळे)

घोसवाड येथे जानकी वृद्धाश्रमाच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार डोईजड होते, तर प्रमुख उपस्थिती विजितसिंह शिंदे सरकार, महेश पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव पोवार, मा. सरपंच धनपाल जुगळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भूपाल नाईक, ग्रामदैवत संपादक विजय फडतारे, संजय बाबूराव पाटील, अशोक नारायण कमते, बाबासो बापूसो मिसाळ, हे होते.

सुरुवातीला स्वागत प्रास्ताविक जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक बाबासो पुजारी यांनी केले. त्यावेळी हंकारे पुढे बोलताना म्हणाले, जगात आई-वडिलांसारखा देव नाही. त्यांची सेवा करा, त्यांना मान-सन्मान द्या, त्यांच्या कष्टाचे कौतुक करा.

बाप म्हणजे कुटुंबाचा मोठा आधार असतो, आई म्हणजे संस्काराची माऊली असते.

सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे एकत्र कुटुंब आणि आनंदी जीवन यासाठी वाडवडिलांचा मान-सन्मान ठेवा, आदर करा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही.

सदरच्या व्याख्यान ऐकण्यासाठी संपूर्ण गाव सिद्धेश्वर मंदिराच्या मैदानामध्ये एकत्र आले होतो. त्यामध्ये माता-भगिनींची लाक्षणिक उपस्थिती होती.

No comments:

Powered by Blogger.