संजय पोवार यांना राज्यस्तीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार जाहीर.
संजय पोवार यांना राज्यस्तीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार जाहीर.
-----------------------------------
भुदरगड प्रतिनिधी
स्वरूपा खतकर
-----------------------------------
कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवनला होणार पुरस्काराचे वितरण.
पर्यावरण संवर्धन, अवयव दान आणि विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवणारे भुदरगड तालुक्यातील पळशिवणे,ठाणेवाडी गंगापूर गावचे पोलीस पाटील,आदर्श समाजसेवक, संजय लक्ष्मीबाई बाबुराव पोवार यांना कोल्हापूरच्या साप्ताहिक आढावा महाराष्ट्र व लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चँनेल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे.या पुरस्कारामूळे त्यांच्यातील समाजसेवेच्या तळमळीला उजाळा मिळाला आहे.कोल्हापूरच्या शाहू स्मारक भवन येथे या पुरस्काकाराचे वितरण होणार आहे.
पोलीस पाटील संजय पोवार हे २०१६ साली या पदावर रूजू झाले.या माध्यमातून जनतेशी संवाद साधत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत आणले आहेत. तिन्ही गावची एकही तक्रार त्यांनी पोलीस स्टेशनला पाठवली नाही,हे त्यांचे विशेष आहे.सारे वाद तंटे,झगडे त्यांनी गावपातळीवरच मिटवले आहेत.या तीनही गावात कायदा व सुव्यवस्था चांगल्या पध्दतीने हाताळत आणली आहे. आपल्या पदाच्या माध्यमातून अनेक गु्न्हे त्यांनी उघडकीस आणून पोलीस खात्याला सहकार्य केले आहे, कोविड काळात त्यांच्या हातून चांगली सेवा झाली आहे. आजारपणातील अनेक माणसांना जीवदानासाठी अवयवदानही कधी कधी महत्वाचे ठरते ही गरज ओळखून या छोट्याशा गावातील लोकांचे प्रबोधन करून त्यांना अवयवदानासाठी प्रवृत्त करून पोलीस पाटील त्यांनी आजच्या जनतेसमोर चांगलाच आदर्श घालून दिला आहे पोलीस निरीक्षक लोंढे तसेच पी एस आय शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदानाचा व वृक्षारोपण उपक्रम राबविला आणि तो त्यांच्या माध्यमातून यशस्वी झाला,आजवर जवळपास शेकडो लोकांनी मृत्यूनंतर अवदानासाठीची नोंदनी प्रक्रिया पुर्ण केली आहे.
वृक्ष रोपण,वनसंवर्धन त्या साठी वृक्षदिंडी काढून पंचक्रोशीला पर्यावरणाचे महत्व पटवून देण्याचे काम ते करत आले आहेत..या साऱ्या व्यापात पत्नी संपदा हिचे त्यांना मोलाचे सहकार्य व पाठबळ मिळत आले आहे. घरसंसारात मुलगा व मुलगी अशा दोघांचेही सहकार्य त्यांना लाभत आले आहे.

No comments: