मुख्याधिकारी टीना गवळींच्या कारभारावर संतापाचा ज्वालामुखी! लाखोंचा भ्रष्टाचार, दिखावा आणि आलिशान महालाचा सवाल.
मुख्याधिकारी टीना गवळींच्या कारभारावर संतापाचा ज्वालामुखी! लाखोंचा भ्रष्टाचार, दिखावा आणि आलिशान महालाचा सवाल.
---------------------------------------
जयसिंगपूर प्रतिनिधी
नामदेव भोसले
-----------------------------------------
जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असून शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून VDK फॅकल्टीचे बिल थकवून ठेवलेले असताना, आरोग्य व बांधकाम विभागामध्ये लाखो रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
अपूर्ण विकासकामांकडे दुर्लक्ष करून, नगरपरिषदेच्या निधीतून अश्वरुडी शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळा आणि “शाहू महोत्सव” या कार्यक्रमांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना बोलावून दिखावा करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमांच्या नावाखाली खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचा हिशोब आजवर स्पष्ट करण्यात आलेला नाही, असा आरोप शहरातील सुसज्जन नागरिक करत आहेत.
जयसिंग महाराज उद्यानातील अर्धवट कामाकडे मुख्याधिकारी गवळी यांनी लक्ष दिले का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपरिषदेच्या विविध बोगस कामांतून निधीचा डल्ला मारत सांगलीतील आकाशवाणी कार्यालयासमोर आलिशान महल उभारण्यात त्या व्यस्त आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
याशिवाय, गवळी यांची बदली कोल्हापूर येथे झाली असतानाही त्या पुन्हा जयसिंगपूरमध्ये कशा परत आल्या? गेले सात वर्ष एका ठिकाणी कशा हा प्रश्नही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. नगरपरिषदेतील “पडद्यामागच्या कलाकारांना” आता आगामी निवडणुकीत जनता नक्कीच जागा दाखवेल, असा इशारा शहरातील नागरिकांनी दिला आहे.

No comments: