Header Ads

शाहुवाडी तालुक्यात 7 मार्च पासून महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन- तहसीलदार सीमा सोनवणे यांची माहिती.

 शाहुवाडी तालुक्यात 7 मार्च पासून महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन- तहसीलदार सीमा सोनवणे यांची माहिती.

---------------------------------

मलकापूर प्रतिनिधी 

रोहित पास्ते

---------------------------------

     सर्वसामान्यांचे महसूल विषयक प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि शासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवण्यासाठी शाहुवाडी तहसील कार्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत तालुक्यातील सहा मुख्य महसूल मंडळामध्ये हे अभियान राबवले जाणार असल्याची माहिती प्रेस नोट द्वारे शाहुवाडीच्या तहसीलदार सीमा सोनवणे यांनी दिली.


प्रलंबित कामांचा निपटारा करणे व प्रशासनाच्या योजना व त्याबाबतची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हा प्रमुख उद्देश या अभियानाचा असून शासनाचा महसूल व वन विभागाच्या विशेष निर्णयानुसार हे अभियान हाती घेतले आहे. प्रशासन लोकांच्या दारी या संकल्पनेतून हे शिबिर आयोजन केले आहे यामध्ये तक्रार निवारण, डिजिटल सेवांचा वापर या बाबींचा समावेश आहे या सर्व बाबींची माहिती देण्यासाठी माननीय उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे पन्हाळा यांचे अध्यक्षतेखाली तहसीलदार सीमा सोनवणे यांचे उपस्थितीत शनिवार दिनांक 28/ 2 /2026 इत्यादी रोजी बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीला तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी बैठकीमध्ये उपस्थित होते सदर बैठकीमध्ये शासन निर्णयाबाबत सर्व माहिती देण्यात आली.


या अभियानामध्ये मिळणाऱ्या प्रमुख सेवा1) डिजिटल सेवांचे प्रशिक्षण व त्यांचा जास्तीत जास्त वापर करणे 2)जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत सातबारा वाचन पूर्ण करून ए कु पु नोंदी. अ. पा. क. नोंदी निर्गत करण्याची कार्यवाही करणे.3) संजय गांधी योजनेचे पात्र लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र देणे नवीन अर्ज स्वीकारणे 4) दाखले वाटप न झालेल्या विद्यार्थ्याकडून आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज भरून घेणे 5)प्रलंबित फेरफार निकाली काढणे 6) अभिलेख दुरुस्ती सातबारा मधील चुका संदर्भात अर्ज स्वीकारणे व कलम 155 नुसार दुरुस्ती करणे. 7 )अकृषक तरतुदी संदर्भातील सुधारणा बाबत मार्गदर्शन करणे. 8)भूसंपादन केलेल्या व 

अकृषक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्ती पत्रकाप्रमाणे सातबारा पत्रकी अमल घेऊन दुरुस्त सातबारा वाटप करणे यासह उत्पन्न, रहिवासी, जात,आणि नॉन क्रिमी लेयर यासारखे महत्त्वाची प्रमाणपत्र त्यादिवशी देण्याचा प्रयत्न आहे. तसेच ग्रामविकास कृषी विभागासह इतर विभागाच्या सेवा लोकांना पुरवणे व आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत रक्त तपासणी करणे, ऍग्री स्टॅक नोंदणी, पीएम किसान नोंदणी करणे या सुविधा देण्यात येणार आहेत 

(7 मार्च सरूड आनंद हॉल,) (14 मार्च आंबा हायस्कूल आंबा) (10 एप्रिल समर्थ हॉल बांबवडे )(17 एप्रिल करंजफेन आनंद कुंज प्राथमिक शाळा)

(8 मे दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी) (15 मे मलकापूर संकल्प सिद्धी हॉल येळाने) या ठिकाणी सदर शिबिरांचे आयोजन केले आहे. पारदर्शक आणि लोकाभिमुख महसूल प्रशासन देण्यासाठी व लोकांना सेवा पुरवणे हा मुख्य उद्देश या अभियानाचा असून नागरिकांनी आपल्या मंडळातील शिबिरांच्या दिवशी व पूर्वी सर्व विभागांच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून त्या त्या विभागाकडे अर्जदार यांनी परिपूर्ण अर्ज देण्यात यावेत तसेच आवश्यक मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रतिंसह उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री समीर शिंगटे उपविभागीय अधिकारी पन्हाळा, व सीमा सोनवणे तहसीलदार शाहूवाडी यांनी केले आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

No comments:

Powered by Blogger.