Header Ads

प्रा. संदेश चव्हाण यांच्या आदेशाने महाराष्ट्रात ग्रामसभा ठराव अभियान सुरू; गोर बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गानुसार आरक्षणाची मागणी.

 प्रा. संदेश चव्हाण यांच्या आदेशाने महाराष्ट्रात ग्रामसभा ठराव अभियान सुरू; गोर बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गानुसार आरक्षणाची मागणी.


्पुसद तालुका प्रतिनिधी.

पुसद: गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रा. संदेश भाऊ चव्हाण. यांच्या आदेशाने राज्यभरात "सकल गोर बंजारा एसटी आरक्षण अभियान"ला सुरुवात झाली आहे. या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील  5000 ते 6000 ग्रामपंचायती कडून ग्रामसभा घेऊन "गोर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे" असा ठराव मंजूर करून घेण्यात येत आहे.बंजारा समाज हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्या आदिवासी स्वरूपाचा समाज आहे. मात्र गेली अनेक वर्षे पासून शासनाकडे आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. या अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने शासनावर दबाव टाकण्यासाठी गावागावात जागृती करून ठराव अभियान राबवण्यात येत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील आरेगाव,गायमुखनगर, इंदिरानगर,रामनगर,नंदीपूर,शेंबाळपिंपरी,  जमशेटपूर,मोहा(ई),शिवानगर, चोंडी, काटखेड,लोणी,सावंगी,वनवार्ला, या ग्रामपंचायत यांनी एकमुखी ठराव मंजूर केला आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन गोर सेना जिल्हाध्यक्ष जय राठोड, यांनी केले आहे.सर्व ग्रामपंचायतींचे ठराव एकत्र करून लवकरच ते मा.राज्यपाल व मा. मुख्यमंत्री.यांना निवेदनाद्वारे सादर करण्यात येणार आहेत,अशी माहिती जय राठोड यांनी दिली.

No comments:

Powered by Blogger.