Header Ads

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गजानन वानखेडे तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चिरमाडे यांची निवड.

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गजानन वानखेडे तर उपाध्यक्षपदी विठ्ठल चिरमाडे यांची निवड.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सिद्धार्थ कदम

पुसद तालुका प्रतिनिधी.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पंचायत समिती पुसद केंद्र सावरगांव (बं )अंतर्गत येत असलेल्या मांडवा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार नुकती पार पडली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अल्का  ढोले, तर प्रमुख उपस्थिती पोलीस पाटील दत्तराव पुलाते, पंडित पुलाते, वसंता आडे,नथ्थु ढोले,प्रकाश ढोले,रमेश ढोले,कैलास राठोड,गणेश ढोले, दयाशिल ढोले, धम्मदीप ढोले उपस्थित होते.

  शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बहुमताने गजानन वानखेडे ,उपाध्यक्षपदी विठ्ठल चिरमाडे शिक्षणप्रेमीपदी विठ्ठल राठोड  यांची निवड झाली. तर सदस्य  अल्का  ढोले, कपिल  आडे, शितल  पुलाते, पुष्पा  आबाळे, ज्योती  ढोले, लता राठोड, मालाबाई चव्हाण, अश्विनी  आबाळे,अनिल ढोले हे उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका  भारती शेळके यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य, भूमिका, जबाबदारी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे संचलन मुख्याध्यापक  नरेश नालमवार यांनी केले तर सभेच्या यशस्वीतेसाठी  शिक्षिका विश्रांती मस्के , शिक्षिका वैशाली रणमले यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Powered by Blogger.