संत शिरोमणी नामदेव महाराज यांची 676 समाधी सोहळा राधानगरीत उत्साहात साजरा
संत शिरोमणी नामदेव महाराज यांची 676 समाधी सोहळा राधानगरीत उत्साहात साजरा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.
~±~~~~~~~~~~~~~~~~~~~
राधानगरी येथील संत शिरोमणी नामदेव शिंपी समाजाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सौ व श्री राजेंद्र काळेबेरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमा चे पालखीतून राधानगरी शहरातून दिंडी अभंग व भजन म्हणत व संत शिरोमणी महाराज यांच्या जयजयकारण राधानगरी शहर दुमदुमले तसेच संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी मेन रोडवर असणाऱ्या नव्या अंबाबाई मंदिरामध्ये ठेवण्यात आली त्यावेळी भजनी मंडळींनी भजन अभंग तसेच महिला अभंग गाणी म्हणण्यात आली त्यानंतर पालखी संत शिरोमणी नामदेव कार्यालय मध्ये आणण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिंपी समाज बांधव व महिला तसेच इतर बांधवांनी महिला वर्गणी त्याचा लाभ अनेक भक्तांनी घेतला अशा पद्धतीने संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

No comments: