Header Ads

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन

 राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन .


इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे .

------------------------------------

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब–वालचंदनगर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे  सचिव वीरसिंह रणसिंग,माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सौरभ बागनवर ,

चेअरमन, अहिल्यादेवी पाणी वापर संस्था, एकशिव व सामाजिक कार्यकर्ते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक काळंगे व उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग व प्रा .डॉ. प्रशांत शिंदे उपस्थित होते.

  कार्यक्रमाची सुरुवात एन.एस.एस. गीताने झाली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले.

प्रा. सचिन पवार यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे सौरभ बागनवर यांनी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, शिस्त, नेतृत्वगुण आणि समाजसेवेची भावना निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमर नांदगुडे यांनी केले व आभार रा.स.यो.अधिकारी डॉ. तेजश्री हुंबे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये ‘सेवा परमो धर्मः’ या भावनेची जाणीव निर्माण झाली.राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त रॅली चे नियोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी ७० स्वयंसेवक व १९ प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.