मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस; चोरीच्या होंडा शाइन मोटारसायकल किमंत अंदाजे ५० हजार रुपयांचा मुद्देमालसह आरोपी ताब्यातः "
मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस; चोरीच्या होंडा शाइन मोटारसायकल किमंत अंदाजे ५० हजार रुपयांचा मुद्देमालसह आरोपी ताब्यातः "स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे, चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेणे, गुन्ह्यातील आरोपींचा माग काढणे तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने दिनांक २३/१०/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे यवतमाळ शहरातील एस. बी. आय. चौक परिसरात कारवाई करून पोलीस स्टेशन आर्णी येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून अंदाजे ५०,०००/- रुपये किमतीची होंडा शाइन मोटारसायकल जप्त केली आहे.
कारवाईचा सविस्तर घटनाक्रम दिनांक २३/१०/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पथकास विश्वसनीय गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, नामे राहुल सुभाष राजुरकर, वय २३ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. विसावा कॉलनी, पिंपळगाव, ता. जि. यवतमाळ याने आर्णी येथून एक जुनी वापरती होंडा शाइन मोटारसायकल चोरी केली असून, सदर चोरीची मोटारसायकल क्रमांक MH-29-BN-1528 घेऊन तो यवतमाळ शहरातील एस. बी.आय. चौक परिसरात उपस्थित आहे.
सदर माहिती ही मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने माहितीची पडताळणीकामी संबंधित इसमाचा एस.बी. आय. चौक, यवतमाळ परिसरात जाऊन पाहणी केली असता गोपनीय माहितीमध्ये नमूद केलेल्या वर्णनाची व नोंदणी क्रमांकाची एक होंडा शाइन मोटारसायकल तेथे आढळून आली. सदर मोटारसायकलवर एक इसम बसलेला दिसून आल्याने पोलीस पथकाने त्यास आपला परिचय देऊन त्याचे नाव, पत्ता व इतर माहिती विचारले असता त्याने आपले नाव राहुल सुभाष राजुरकर, वय २३ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. विसावा कॉलनी, पिंपळगाव, ता. जि. यवतमाळ असे सांगितले.
मोटारसायकल चोरीची माहिती उघड सदर इसमाच्या ताब्यातील होंडा शाइन मोटारसायकलच्या मालकी हक्कासंबंधी कागदपत्रे तसेच मोटारसायकल त्याच्या ताब्यात कशी आली, याबाबत पंचांच्या उपस्थितीत विचारपूस करण्यात आली. त्यावेळी राहुल सुभाष राजुरकर याने सदर मोटारसायकल ही सन २०२४ मध्ये शिवनेरी चौक, आर्णी, जिल्हा यवतमाळ येथून चोरी केल्याचे सांगितले.
वरुन माहितीच्या अनुषंगाने मोटारसायकलच्या नोंदणी क्रमांकाची तसेच संबंधित गुन्ह्याची पडताळणी करण्यात असता सदर मोटारसायकल ही पोलीस स्टेशन आर्णी, जिल्हा यवतमाळ येथे दाखल असलेल्या अपराध क्रमांक ४७४/२०२४, भारतीय दंड विधान कलम ३७९ अन्वये नोंद असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाने सदर मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याशी संबंधित मुद्देमाल असल्याने पंचांच्या उपस्थितीत कायदेशीररीत्या जप्त केली.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील :-
१. वाहनाचा प्रकार : होंडा शाइन मोटारसायकल जिचा नोंदणी क्रमांक: MH-29-BN-1528
2. वाहनाचा रंग : ग्रे, अंदाजे किंमत ५०,०००/- रुपये
कारवाई करणारे पथक सदरची कामगिरी कुमार चिता, पोलीस अधीक्षक यवतमाळ, अशोक चोरात, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ आणि
सतीश चवरे पोनि स्था.गु.शा. यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कार्यदे, अंमलदार पोहवा सोहेल मिर्झा, कुनाल मुंडोकार, मिथुन जाधव, पोना किशोर झेंडेकर, सचिन मलाये, पोकों अमित झेंडेकर, पवन ढवळे चासफौ जितंद्र चौधरी सर्वे नेम- स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी हि कारवाई केली

No comments: