Header Ads

शाहूवाडी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश करावा

 शाहूवाडी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश करावा

-------------------------
रोहित फास्टे.
-------------------------

शाहूवाडी : महाराष्ट्र शासनाने नुकताच राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांचा समावेश जाहीर केला असून, त्यामध्ये शाहूवाडी तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. यंदा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी व अनियमित झाल्याने भात, सोयाबीन, भुईमूग तसेच पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाअभावी जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याने शाहूवाडी तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश करावा, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शाहूवाडी तालुका भाजप अध्यक्ष विजयकुमार रेडेकर, नगरसेवक महेश कोठावळे, उदयसिंह कोकरे देसाई, पंचरत्न राजपाल, अजयकुमार चरणकर आदी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.