कुपवाडमध्ये घरासमोरून मोटारसायकल चोरी; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल.
कुपवाडमध्ये घरासमोरून मोटारसायकल चोरी; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल.
*****************
मिरज तालुका
प्रतिनिधी राजु कदम
******************
सांगली : कुपवाड येथील प्रकाशनगर परिसरातून घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुजित चांगदेव भंडारे (वय ३५, व्यवसाय – ऑप्टिकल शॉप, रा. प्रकाशनगर गल्ली क्र. ४, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊ ते ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा या कालावधीत प्रकाशनगर गल्ली क्रमांक ४ येथे फिर्यादीच्या घरासमोर रस्त्यावर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. संबंधित मोटारसायकल ही यामाहा कंपनीची आर-वन फाय (R15) मॉडेलची असून तिचा क्रमांक एमएच १० डीसी ७११६ असा आहे. या मोटारसायकलीची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गु.र. नं. ६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉं. मुळीक (बकल नं. १८१५) हे करत आहेत.


No comments: