Header Ads

करडवाडी-शेळोली बंधाऱ्यावरून चक्क शिडीवरून प्रवास

 करडवाडी-शेळोली  बंधाऱ्यावरून चक्क शिडीवरून प्रवास .


फोटो - करडवाडी- शेळोली बंधाऱ्यावरून वरून शिडी  लावून होतोय धोक्याचा प्रवास

____________

करडवाडी

स्वरूपा खतकर .

------------------

भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीवर करडवाडी आणि शेळोली या दोन गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णपणे ढासळला आहे. बंधाऱ्याचे मोठमोठे काँक्रीटचे स्लॅब आणि दगडी बांधकाम नदीपात्रात कोसळल्याने दोन्ही गावांमधील थेट संपर्क तुटला आहे. 

करडबाडी पलिकडील शेळोली गावात इंडस्ट्रीज असल्याने येथील कामगारांना वेळेत जाण्यासाठीचा हा जवळचा मार्ग आहे. पाचर्डे, करडवाडी, पारदेवाडी. निष्णप या गावातून कामगार व नागरिक कामानिमित्य ये - जा करत असतात. नागरिकांना नदीपार करण्यासाठी ढासळलेल्या बंधाऱ्याच्या उरलेल्या भागावर बांबूची शिडी लावून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काहीवेळा महिला, वयोवृद्ध आणि शेतकऱ्यांना दररोज हा धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

स्थानिकांच्या माहितीनुसार, हा बंधारा अनेक वर्षांपासून जीर्ण झाला होता. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे त्याला मोठे भगदाड पडले होते. वारंवार मागणी करूनही दुरुस्ती न झाल्याने अखेर बंधारा कोसळला आहे 

करडवाडी आणि शेळोली येथील शेती, बाजारपेठ आणि दवाखान्यासाठी नागरिकांना याच मार्गाचा वापर करावा लागतो. बंधारा कोसळल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. पर्यायी मार्गासाठी वळसा घालावा लागत असल्याने वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. 

ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी पूल किंवा तात्पुरत्या मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. तसेच नवीन बंधाऱ्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

No comments:

Powered by Blogger.