२ मेपासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर.
२ मेपासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी जाहीर.
______________
पन्हाळा -प्रतिनिधी
माधुरी मस्कर .
-----------------------
राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शनिवार, दि. २ मेपासून सुट्टी
जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने काढले आहे. शासनाने राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्य विदर्भ तसेच इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू करण्यात याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे.

No comments: