ह.भ.प भिकाजी शिंदे महाराज यांना सेवारत्न पुरस्कार.
ह.भ.प भिकाजी शिंदे महाराज यांना सेवारत्न पुरस्कार.
______________
अंबप प्रतिनिधी.
किशोर जासूद.
------------------
अबंप: येथील ह.भ.प. भिकाजी शिंदे महाराज यांना अविरत कीर्तन सेवेसाठी वारकरी युवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ह.भ.प. भिकाजी शिंदे महाराज हे वारकरी फडाचे निष्ठावंत वारकरी असून गेली ५० वर्षे त्यांची कीर्तन सेवा चालू आहे. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव ह.भ.प. भागवत भिकाजी शिंदे महाराज हे देखील प्रवचनकार व कीर्तनकार आहेत. त्यांचे नातू ज्ञानेश हे मृदंगवादक असून त्यांचा संपूर्ण परिवार हा वारकरी आहे.
ह.भ.प. भिकाजी शिंदे महाराज या नावाने देखील परिसरामध्ये परिचित असून त्यांच्या या ५० वर्षांच्या कीर्तन सेवेबद्दल त्यांना सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

No comments: