Header Ads

जलसंपदा विभागातील कंत्राटी व यांत्रिकी कामगारांचा मेळावा उत्साहात संपन्न.

 जलसंपदा विभागातील कंत्राटी व यांत्रिकी कामगारांचा मेळावा उत्साहात संपन्न.

---------------------------------

मलकापूर प्रतिनिधी

---------------------------------

    श्रम भारतीय जनता कामगार महासंघ संलग्न स्वराज्य जनरल कामगार सेना यांच्या वतीने जलसंपदा विभागातील कंत्राटी व यांत्रिकी कामगारांचा मार्गदर्शन मेळावा तसेच पदाधिकारी निवड कार्यक्रम राजर्षी शाहू महाराज स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला.


यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना कामगार नेते अमितदादा कदम यांनी कामगारांच्या हक्कांबाबत ठाम भूमिका मांडली. कामगारांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला, शासनाने निश्चित केलेले वेतन तसेच सर्व कायदेशीर हक्क मिळालेच पाहिजेत. कामगारांच्या वेतनाची चोरी करणाऱ्या कंत्राटदार अथवा संबंधित व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


“कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वराज्य जनरल कामगार सेना सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. अन्याय झाला तर संघर्ष करू आणि हक्क मिळेपर्यंत लढा देऊ,” असा निर्धार अमितदादा कदम यांनी व्यक्त केला.


यावेळी प्रदेशाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष विनायक जाधव, सचिव आत्माराम चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वैभव फसाले, अमोल गुरव, सरपंच विनायक पाटील, सुनील इंगवले, विजय पिसाळ, सतीश सावंत, चंद्रकांत सावंत, आनंदा सावंत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व जलसंपदा विभागातील मोठ्या संख्येने कंत्राटी व यांत्रिकी कामगार उपस्थित होते.


कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य जनरल कामगार सेनेचे उपाध्यक्ष संजय धुमाळ यांनी केले.

No comments:

Powered by Blogger.