यादवनगरमध्ये पोलिसांचा धडाका! रेकॉर्डवरील गुन्हेगार तलवारीसह जेरबंद
यादवनगरमध्ये पोलिसांचा धडाका! रेकॉर्डवरील गुन्हेगार तलवारीसह जेरबंद.
कोल्हापूर | प्रतिनिधी : रहिम पिंजारी
यादवनगर परिसरात बेकायदेशीरपणे तलवार बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून सुमारे ५०० रुपये किमतीची धारदार तलवार जप्त केली.
साहिल शब्बीर शेख (वय २४, रा. यादवनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५.५५ वाजता राजारामपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मोमीन गल्लीतील साहिल शेखच्या घराची पंचांसमक्ष झडती घेतली. यावेळी घरातून धारदार तलवार आढळून आली.
पोलिसांनी तलवार जप्त करून साहिल शेखला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ५, २५(a)(१) तसेच बी.पी. ॲक्ट १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.
गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर असून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.

No comments: