Header Ads

केसरेकर दाम्पत्य हत्येच्या निषेधार्थ २१ ऑगस्टला सांगली-कुपवाड बंद.

 केसरेकर दाम्पत्य हत्येच्या निषेधार्थ २१ ऑगस्टला सांगली-कुपवाड बंद.


------------------------------------------

सांगली-कुपवाड  प्रतिनिधी

 राजू  कदम 

------------------------------------------

केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने २१ ऑगस्ट रोजी सांगली-कुपवाड बंदचे आवाहन केले आहे. याच दिवशी सायंकाळी ४ वाजता सांगली शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान मोहन केसरेकर यांचेही निधन झाले. आरोपी फरीद शेख याच्यावर कठोर कारवाई करून सक्षम चार्जशीट दाखल करावी, ॲड. हर्षद निंबाळकर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, तसेच साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

बंदमध्ये व्यापारी, नागरिक आणि सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे, तसेच निषेध मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाने केले आहे.

No comments:

Powered by Blogger.