Header Ads

कुपवाडमध्ये वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; पीडित महिलेची सुटका, एक महिला अटकेत

 कुपवाडमध्ये वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; पीडित महिलेची सुटका, एक महिला अटकेत.


कुपवाड | प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील अनैतिक मानवी व्यापाराला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली.

पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील व महिला पोलीस उपनिरीक्षक सपना आडसुळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कुपवाड रस्ता, साईनगर परिसरात जरीना फिरोज शेख (वय ३८) ही महिला ग्राहकांच्या मागणीनुसार आपल्या भाड्याच्या खोलीत महिलांना वेश्याव्यवसायासाठी पुरवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंटर पाठवून खात्री केली आणि संबंधित ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली. वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करत असल्याचा आरोप असलेल्या जरीना शेख हिच्याविरुद्ध बीएनएस कलम १४३ तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यातील कलम ३, ४ व ५ अन्वये एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक जोतीराम पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक सपना आडसुळ, महिला ग्रेड पीएसआय सुवर्णा गोडबोले, पोलीस हवालदार संग्राम गायकवाड व पोलीस हवालदार महेश गायकवाड यांच्या पथकाने केली.

No comments:

Powered by Blogger.