Header Ads

चादुंर बाजार तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना मदत करा.

 चादुंर बाजार तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना मदत करा.


चादुंर बाजार, :कमी पाऊस, पावसातील दीर्घ खंड आणि त्याचा खरीप पिकांसह संत्रा मोसंबी बागांना बसलेला फटका लक्षात घेता चादुंर बाजार तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी संत्रा फळ गळ , या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, 




चादुंर बाजार तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तसेच पावसात मोठे खंड पडल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तूर, कापूस, सोयाबीन, मिरची, वांगी, टोमॅटो, मका, ज्वारी यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून उत्पादनात लक्षणीय घट झाली


आहे. दुसरीकडे संत्रा व मोसंबीच्या मृग बहारातील फळांची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने फळबागायतदार शेतकऱ्यांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.


संत्रा व मोसंबी पिकांमध्ये मृग बहार आणि आंबिया बहार हे स्वतंत्र बहार असून त्यांचे कालावधीही वेगवेगळे आहेत. शासनाच्या संबंधित


योजनांमध्येही बहारनिहाय कालावधी व हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीचा स्वतंत्र विचार करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या झालेल्या मृग बहारातील फळगळतीचे स्वतंत्र पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संत्रा मोसंबीच्या बागांसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च केला आहे. खते, कीटकनाशके, फवारणी, मजुरी, मशागत आणि


शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या


चादुंर बाजार तालुका कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. संत्रा व मोसंबीच्या मृग बहारातील फळगळतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. सन २०२५ मधील अतिवृष्टीचे उर्वरित एक हेक्टरचे मंजूर अनुदान तातडीने द्यावे. सन २०२५-२६ मधील संत्रा मोसंबी आंबिया बहाराच्या पीकविम्याची रक्कम तातडीने अदा करावी.


बागेच्या देखभालीचा खर्च सातत्याने वाढत असताना फळगळतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा आधारच हिरावला आहे.


त्यामुळे शासनाने तातडीने मदतीचा हात देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन मागण्या मान्य करण्यात यावा, 


   यावेळी शेतकरी,विजय भुले ,मयुर खापरे, रवि काशिकर, अंकुश लंगोटे,अरुण लंगोटे, सचिन निकम यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.