हुपरीच्या सौरभ खोत यांना राज्यस्तरीय ‘छत्रपती शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान!
हुपरीच्या सौरभ खोत यांना राज्यस्तरीय ‘छत्रपती शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान!
सामाजिक सेवेतील योगदानाची दखल; इचलकरंजीत मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव..
हुपरी | प्रतिनिधी : सचिन कुंभार
हुपरी येथील सौरभ किरण खोत यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘छत्रपती शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार २०२६’ अंतर्गत ‘सामाजिक सेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे हुपरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या सामाजिक कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी येथे साप्ताहिक शुभकार्य यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात हा गौरव करण्यात आला. शिवाजीनगर पोलीस स्टेशन, इचलकरंजी येथील पोलीस उपनिरीक्षक (PSI) डॉ. आरती कानिरे मॅडम तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सौरभ खोत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजाप्रती बांधिलकी जपत सामाजिक हितासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सौरभ खोत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
सामाजिक क्षेत्रातील कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने सौरभ खोत यांचे हुपरी परिसरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामुळे सामाजिक कार्यासाठी पुढे येणाऱ्या युवकांनाही प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments: