Header Ads

खामगाव जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित बालपण अभियान संपन्न

 खामगाव जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित बालपण अभियान संपन्न




 आळेफाटा (प्रतिनिधी): तालुका विधी सेवा समिती जुन्नर यांच्या वतीने आज दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव(ता. जुन्नर)येथे 'सुरक्षित बालपण' अभियानांतर्गत कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वार्षिक कार्यक्रम पत्रिकेनुसार सकाळी ११ ते १२ या वेळेत हे शिबीर घेण्यात आले.

जिल्हा न्यायाधीश-१ तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. बी. शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जुन्नर वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष  निलीमा शेरकर व करमेश गाडेकर यांनी मार्गदर्शन केले. तालुका विधी सेवा समितीचे समन्वयक प्रशांत मोरतळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश घोलप, मुख्याध्यापक तानाजी तळपे, दिलीप लोकरे, अजिंक्य घोलप, अंकुश कोकणे, राहुल रावते यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बालकांचे हक्क, बालसुरक्षा, पोक्सो कायदा, वैयक्तिक व ऑनलाईन सुरक्षितता, तक्रार यंत्रणा व मोफत कायदेशीर सहाय्य यावर जनजागृती करण्यात आली.

प्रास्ताविक प्रशांत मोरतळे यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप लोहकरे तर आभार तानाजी तळपे यांनी मानले.

No comments:

Powered by Blogger.