बामणोली मध्ये बेकायदेशीर गुंठेवारी विक्री व निकृष्ट दर्जाचा कमाबाबत गट विकास अधिकारी यांना निवेदन.

 बामणोली मध्ये बेकायदेशीर गुंठेवारी विक्री व निकृष्ट दर्जाचा कमाबाबत गट विकास अधिकारी यांना निवेदन.

------------------------------------------------------------------------------




------------------------------------------------------------------------------

बामणोली गावात बेकायदेशीर गुंठेवारी विक्री जोमात सुरू





 असुन गुंठेवारी दाखला बनावट देवुन सर्व सामान्य जनतेची फसवणुक केली जात आहे. गोर गरीब जनता आपल्या जिवन भराची गुंतवणुक लावुन जागा खरेदी करत असते. एन ए ची फोड खरेदी बंद असल्या कारणा ने नवीन गुंठेवारी बनावट दाखला देवुन सुरू आहे. सदरच्या कामात ग्रामपंचायत बामणोली पुर्ण पणे सामील आहे. व या प्रकरणाची त्यांना पुर्ण पणे कल्पना देवून ही ते दोषीना पाठीशी घालत आहेत. गामपंचायत बामणोली ची पुर्ण पणे निपक्ष चौकशी करून दोषीवर योग्य कारवाई करावी. या पुर्वी झालेल्या खरेदीदाराची नावे सात बारा  वर नोंद करून मिळावी व यानंतर होणाऱ्या खरेदी बंद कराव्यात. जुन्या सर्व खरेदी दाराचा योग्य तो विचार करून त्यांना दिलासा मिळावा.

आम्ही दत्तनगर बामणोली गावतील रहीवाशी असुन आमच्या भागात दलीत वस्ती अंतर्गत झालेले रस्त्याचे काम श्री मनोज तारे या ठेकेदाराने केले आहे. सदरचे काम निकष्ट दर्जाचे झालेले आहे. काम होवून अद्याप दोन महीने ही पूर्ण नाहीत व त्याच २०० ते ३०० पेव्हिंग ब्लॉक फुटले आहेत. व १४ व्या वित्त आयोगा झालेल्या घोडके घर ते सरगर घरा पर्यंत गटर सदरचे काम श्री. प्रविण वाघमोडे या कामात काम अपूर्ण असताना .





ही बील काढण्यात आले आहे. निकष्ट दर्जाच्या पाइप झाकण व त्वरीत बदलून मिळावीत. सदरच्या कंत्राटदाराना  नोटीस काढूनही सदरचे काम सुधारून मिळाले नाही. संबंधीत ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून दोष दायीत्व अर्तगंत काम व्यवस्थीत पुर्ण करून मिळावे.











असे निवेदनात म्हटले आहे.





Comments