Header Ads

शाहूपुरी डी.बी. पथक व एलसीबीची संयुक्त कारवाई; घरफोडीचा चार तासांत छडा

 शाहूपुरी डी.बी. पथक व एलसीबीची संयुक्त कारवाई; घरफोडीचा चार तासांत छडा.

कोल्हापूर 

सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती अन् गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी जेरबंद; ८ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

ताराबाई पार्क परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा शाहूपुरी पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) संयुक्तपणे अवघ्या चार तासांत छडा लावला. तपास पूर्ण करून संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीस गेलेला ८ लाख ६२ हजार रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०६/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०५ (A), ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० या कालावधीत ताराबाई पार्क येथील सहजिवन परिसरातील घराच्या मागील दरवाजातून प्रवेश करून चोरट्याने कपाटातील लॉकरमधील दागिने व रोख रक्कम लंपास केली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी डी.बी. पथक आणि एलसीबीचे पथक संयुक्तपणे तपासासाठी रवाना झाले. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. त्यासोबतच तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.

तपासातून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे सचिन सदाशिव हासोळकर (वय ४२, रा. कदमवाडी, कोल्हापूर) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे गंठण, चैन, अंगठ्या, वाळा, कानातील टॉप्स, चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत शाहूपुरी डी.बी. पथक आणि एलसीबीच्या पथकाने केलेल्या समन्वयपूर्ण तपासामुळे अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा छडा लागला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती यांचा प्रभावी वापर करत पथकाने आरोपीपर्यंत पोहोचत चोरीचा मुद्देमालही हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत आटपाडकर तसेच शाहूपुरी डी.बी. पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-अंमलदारांनी केली.

चार तासांत गुन्ह्याचा छडा!

घरफोडीची घटना घडल्यानंतर तपासाला वेग देत डी.बी. पथक आणि एलसीबीने संयुक्तपणे केलेली कारवाई ही या गुन्ह्याच्या तपासातील निर्णायक ठरली. आरोपी ताब्यात घेण्याबरोबरच चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने पोलिसांच्या तपासकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Powered by Blogger.