धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करा शिवसेना वाहतूक सेनेची मागणी.
धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करा शिवसेना वाहतूक सेनेची मागणी. गांधीनगर:- अँग्रीकल्चर पासींग वाहनातून राजरोस कमर्शियल आणि धोकादायक, बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करावी या मागणीची निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांना शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना (महासंघ) (उबाठा) गटाच्या वतीने देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यात तसेच शहरात ट्रॅक्टर ट्रॉली, डंपर, मिक्सर, या वाहनातून बांधकाम साहित्याची, नियमबाह्य वाहतूक करत आहेत. त्या वाहनचालकांचे परवाना तसेच अन्य कोणत्याही कायदेशीर बाबी पूर्ण नसतात. भरधाव वाहन चालवले जात आहे. बिसिस्त वाहन पार्किंग, अशामुळे शहरासह ग्रामीण भागात अपघातात वाढ होत आहे. सध्या साखर कारखाने सुरू असून ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीमधुन क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून जीवघेणी वाहतूक सुरू आहे. ड्रायव्हर कडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. कायदा हा सर्वांना समान असून प्रादेशिक विभागाच्या भरारी पथकाकडून मात्र छोटे-मोठे टेम्पो व्यवसायिक, ऑटो रिक्षा, अशा वाहनावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तो अन्यायकारक आहे...