साई दर्शन जनता क्रेडिट सोसायटी प्रकरणी पोलीस प्रशासनाचा सामान्य जनतेवर अन्याय.

साई दर्शन जनता क्रेडिट सोसायटी प्रकरणी पोलीस प्रशासनाचा सामान्य जनतेवर अन्याय. ------------------------------------------- कोल्हापूर : प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे -------------------------------------------- हजारो लोकांना कर्जाचे अमिष दाखवत साई दर्शन जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड रंकाळा या क्रेडिट सोसायटीचे चेअरमन शुभम कृष्णात देशमुख व संपूर्ण संचालक मंडळ यांनी आर्थिक अडचणीत असलेल्या गरजू लोकांना कर्जाच्या अमिषा पोटी कोट्यावधी रुपयाचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. कर्जाच्या पोटी ठेवी स्वीकारून तसेच मुदत संपलेल्या ठेवीदारांना ठेवीचे पैसे परत करण्याची वेळ आली असता ठेवीदारांना शस्त्रधारी बाऊन्सर कडून दमदाटी दाखवण्याचे प्रकार या क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन व संचालकाकडून केले जात असता यावेळी समस्त ठेवीदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्याकडे धाव घेतली असता जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोर्ले व प्रसाद पाटील यांनी साई दर्शन क्रेडिट सोसायटी यांच...