सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पत्रकार बातमीचे व्हिडिओ चित्रीकरण करू शकतात!
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पत्रकार बातमीचे व्हिडिओ चित्रीकरण करू शकतात! ------------------------------------------------ फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र संपादक शशिकांत कुंभार ------------------------------------------------ पत्रकारांना चित्रीकरण करण्यास मज्जाव करून अपशब्द वापरल्याबददल सातारचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी सातारा : सातारा जिल्हा परिषद येथे सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाखरी तालुका फलटण येथील एका विद्यालयातील विद्यार्थी व पालक न्याय मागण्यासाठी मोर्चा घेऊन आलेले होते. आमच्या दैनिक सुपर भारत व फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र चे सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे त्यावेळी त्या ठिकाणी वृतसंकलनासाठी उपस्थित होते. मोर्चा आल्याने ते व्हिडिओ चित्रीकरण करत असताना मोर्चाचे म्हणणं ऐकण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आले असताना खिलारी यांनी त्यांचे अंगरक्षक पोलिस लाड यांना यांचा मोबाईल हिसकावून घ्या,असे सांगितले व लाड यांनी मोबाईल हिसकावून घेत असताना किर...