Posts

Showing posts from December, 2022

युवापिढीने ज्येष्ठांचा आदर आणि सन्मान ठेवल्याने पुण्य मिळेल : सखी साई रमेश प्रकाशजी महाराज

Image
युवापिढीने ज्येष्ठांचा आदर आणि सन्मान ठेवल्याने पुण्य मिळेल : सखी साई रमेश प्रकाशजी महाराज --------------------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------------------- गांधीनगर:- आपल्या कुटुंबातील युवा पिढीने ज्येष्ठांचा आदर राखून सन्मान ठेवा. त्यांची सेवा केल्याने  चांगले फळ आणि पुण्य तुम्हाला निश्चित मिळेल असे प्रतिपादन सखी साई रमेश प्रकाशजी महाराज (कटनी, मध्य प्रदेश) यांनी केले. ते गांधीनगर येथील सिंधी सेंट्रल पंचायत मध्ये आयोजित केलेल्या स्वामी शांति प्रकाश चालीसा महोत्सव समारंभ आणि गांधीनगर, कोल्हापूर येथील सिंधी समाजातील प्रतिष्ठित जेष्ठांच्या सन्मानाप्रसंगी  बोलत होते. साई रमेश प्रकाशजी महाराज म्हणाले   कुटुंबातील जेष्ठांनी हाल, अपेष्टा, आणि कष्ट करून आपल्या पिढीचा सांभाळ केला आहे. त्यामुळे युवा पिढीने त्यांचा अनादर न करता त्यांचा आदर राखून त्यांची सेवा केल्याने पुण्य मिळेल. या कार्यक्रमादरम्यान कोल्हापुर आणि गांधीनगरातील प्रतिष्ठित सत्तर जेष्ठ नागरिका...

कुपवाड मध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कुपवाड मधील एकावर गुन्हा दाखल.

Image
 कुपवाड मध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कुपवाड मधील एकावर गुन्हा दाखल. ---------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------   कुपवाड शहरातील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयताविरुद्ध कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (अनिल गोविंद गडदे वय. 42 राहणार. बामणोली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे  नाव आहे.       पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही घरात एकटीच असल्याचे पाहून संशयित अनिल गडदे याने तिचा विनयभंग केला असल्याची तक्रार पीडित महिलेने कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलीसांनी अनिल गडदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा.

Image
 अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा. ---------------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  प्रतिनिधी/नागपूर ---------------------------------------------------------------- अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने बर्डी येथील मदन गोपाल हायस्कूलमधील १७ मुलांना विषबाधा झाल्याने बर्डी येथीलच लता मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलांवर ताबडतोब प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. हर्ष देशमुख यांनी दिली. या मुलांना उलट्या व मळमळल्यासारखे वाटत होते. परंतु आता मुले ओके आहे, असे डाॅ. देशमुख यांनी सांगितले.   या मुलांना शाळेच्या बाहेर एका अनोळखी व्यक्तीने चाॅकलेट वाटल्याचे समोर आले आहे. चाॅकलेट वाटणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, याचा शोध सुरू असल्याची माहिती बर्डी पोलिसांनी दिली आहे. कोणी वाढदिवशी वाटले की काही वेगळा हेतू होता या सर्व बाबी तपासानंतर उघड होईल असे पोलिसांनी सांगितले.

दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाला "कलाविष्कार".

Image
 दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाला "कलाविष्कार". ---------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------- दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पूर्ली ता.करवीर येथे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी या शाळेत कलाविष्कार हा कार्यक्रम घेतला जातो या ही वर्षी अगदी उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला . जवळ जवळ सहा दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, गीत गायन , कथाकथन , रांगोळी स्पर्धा, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, खाद्य महोत्सव असे कार्यक्रम घेण्यात  आले .शाळेच्या हॉल मध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे, नक्षीकाम, विविध आकर्षक वस्तू यांचे कलादालन भरवले होते. यामध्ये कलाशिक्षक अमोल फराकटे सर यांनी शाहू महाराज यांनी बांधलेल्या राधानगरी धरणाची हुबेहूब प्रतिकृती या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते.अनेक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदवला.या करीता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.ब...

ए. एस. ट्रेडर्स व ट्रेडविंग सोल्युशन्सचे जिल्ह्यातील कार्यालये सुरू!

Image
 ए. एस. ट्रेडर्स व ट्रेडविंग सोल्युशन्सचे जिल्ह्यातील कार्यालये सुरू! -------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र कोल्हापूर प्रतिनिधी अन्सार मुल्ला -------------------------------------------------------- काल कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये हजारोच्या संख्येने जमत ए. एस. ट्रेडिंगच्या गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन दिले होते.  या निवेदनानुसार ए. एस. ट्रेडिंग या कंपनीतील हजारो ठेवीदारांना एका तक्रारीनंतर चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी ठेवीदारांच्या शिष्टमंडळाला अतिशय विश्वासपूर्ण आश्वासक प्रतिसाद दिल्याने, ठेवीदारांच्या आणि कंपनीच्या व्यवस्थापनातील लोकांमध्ये आशादाय चित्र निर्माण झाले आहे. आज पासून ए. एस. ट्रेडर्स आणि ट्रेडविंग सोल्युशन्स या कंपनीचे शहरातील तसेच जिल्ह्यातील इतरत्र शेकडो कार्यालय सुरू करण्यात आले. तसेच कंपनीचे दैनंदिन कामे पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी ठेवीदारांना त्यांच्या कार्यालयाची संरक्षणाची संपूर्ण हमी दिल्याने कंपनी तसेच ठेवीदारांच्य...