Posts

Showing posts from October, 2022

जयसिंगपूर,राजीवगांधीनगर , उदगाव परिसरात निधी बँकेच्या नावाने खाजगी सावकारकीचे जुगाड जोरात खाजगी सावकारकीने गोरगरीब जनतेचे जगणे मुश्किल ब्लॅक मनी लपवण्यासाठी कथित व्यक्तीनी काढले निधी बँक.

Image
  जयसिंगपूर,राजीवगांधीनगर , उदगाव परिसरात निधी बँकेच्या नावाने खाजगी सावकारकीचे जुगाड जोरात खाजगी सावकारकीने गोरगरीब जनतेचे जगणे मुश्किल ब्लॅक मनी लपवण्यासाठी कथित व्यक्तीनी काढले निधी बँक. ----------------------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र जयसिंगपूर प्रतिनिधी नामदेव भोसले  ----------------------------------------------------------------------- गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे जयसिंगपूर शहर आणि परिसरातील सर्वच घटकातील आर्थिक गणित कोलमडले आहे. यातून अनेकांनी 10 ते 15 पासून 25  टक्क्यांपर्यंत व्याजाचे धंदे जीवनाचा गाडा चालवण्याचा प्रयत्न केला होता आणि सुरु आहे.आता या निधी बँकेच्या नावाने खाजगी सावकारकी वसुलीसाठी तगादा लावला आहे.    कोरोनामुळे नोकरी, व्यवसायापासून वंचित राहिलेल्यांना एकाचे कर्ज भागवण्यासाठी दुसऱ्या सावकाराचे कर्ज काढावे लागत असल्याचे चित्र आहे.काही खंडणी बहाद्दरांनी आपला अवैध काळा पैसा लपवण्यासाठी नवी शक्कल लढवली. सामाजिक कार्यकर्ते व कथित व्यक्तीनी मिळून आपले खाजगी सावकारकीची एक निधी बँकेच  चालू केली. त्या निधी बँके

माजी सैनिकांच्या समस्या मांडण्यासाठी संसदेत प्रतिनिधी हवा,.

Image
माजी सैनिकांच्या समस्या मांडण्यासाठी संसदेत प्रतिनिधी हवा,खासदार धैर्यशील माने. --------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------------- सैनिकांनी देशसेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर ते समाजसेवा बजावत असतात समाजातील आणि माजी सैनिकांच्या समस्या मांडण्यासाठी संसदेत एखादा प्रतिनिधी असावा यासाठी राष्ट्रपती नियुक्त कोठ्यातून सदस्याची नियुक्ती होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खास. धैर्यशील माने यांनी केले.   येथील अष्टविनायक सांस्कृतिक हॉल येथे रविवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्र राज्य सैनिक संघटना संलग्न शिरोळ तालुका सैनिक संघटनेतर्फे आयोजित सैनिक मेळाव्या प्रसंगी खास.माने बोलत होते.अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर माजी खास सुधीर सावंत होते.राज्य कार्याध्यक्ष नारायण अंकुशे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तुकाराम सूर्यवंशी,उपाध्यक्ष विजय पाटील,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय माने,रुपाली जुगळे आदी प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना ब

कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती खास.मंडलिक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

Image
  कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती खास.मंडलिक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन .  ---------------------------------------------------------------------------- ---------------------------------------------------------------------------  येथील  सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्रो.डॉ. ए .जी .मगदूम' यांच्या कागल तालुक्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थांची सद्यस्थिती ' या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रा.संजयदादा मंडलिक  यांच्या हस्ते झाले. यावेळी पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ.ए.जी.मगदूम  ,महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. टी. एम .पाटील ,कोल्हापूर जिल्हा कृषी उद्योग संघाचे अध्यक्ष ,प्रा. संभाजी मोरे ,मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार ,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.शिवाजी होडगे, डॉ. एम. ए. कोळी, सदाशिव गिरीबुवा, सुनील कडाकणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  सदर संशोधन ग्रंथ सहकारी सेवा पतसंस्थांना दिशादर्शक ठरेल .असा आशावाद खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांनी व्यक्त केला. सदर संशोधन ग्रंथाच्या लिखाणाबद्दल प्रा.डॉ. ए.जी.मगदूम यांचे सर्वत

पेन्शन वाढीचा जीआर दाखविण्यास ते मुहूर्त पाहत आहेत काय?

Image
 पेन्शन वाढीचा जीआर दाखविण्यास ते मुहूर्त पाहत आहेत काय? राजे समरजितसिंह घाटगे ----------------------------------------------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------------------------------------------- संजय गांधी,श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची एक हजार रुपये वाढीव पेन्शन आपणच केल्याचे आमदार मुश्रीफसाहेब सातत्याने  सांगतात.याबाबत गेल्या एक महिन्यापासून त्यांच्या मंत्रीपदाच्या काळातील पेन्शनवाढीचा जीआर दाखविण्याबाबत आम्ही  जाहीरपणे विचारत आहोत .मात्र त्यांनी तो अद्याप दाखविलेला नाही.मुश्रीफसाहेब,तुमच्या मंत्री पदाच्या काळातील पेन्शन वाढीचा जीआर दाखविण्यास मुहूर्त बघत आहात काय? असा खोचक सवाल शाहू ग्रुपचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केला.    सुरुपली(ता.कागल) येथे प्रामाणिकपणे पीक कर्ज भरणा-या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानसाठीच्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल श्री. घाटगे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बो

बागेश्वरी साखर कारखान्याने एकरी १० हजार घेतले होते,ते ऊस तोडण्या अगोदर शेतकऱ्यांना परत करा. प्रकाश सोळंके यांची मुख्य मंत्री यांच्याकडे मागणी.

Image
 बागेश्वरी साखर कारखान्याने एकरी १० हजार घेतले होते,ते ऊस तोडण्या अगोदर शेतकऱ्यांना परत करा. प्रकाश सोळंके यांची मुख्य मंत्री यांच्याकडे मागणी. ---------------------------------------------------- जितेंद्र गाडेकर जिल्हा प्रतिनिधी, जालना. --------------------------------------------------- जालना ,मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री यांना मा.जिल्हाधिकारी जालना यांच्यामार्फत निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे.  तक्रारी पुढे म्हटले आहे की शासनाने पाचट कचरा तीन पट वाढ केलेला निर्णय रद्द करण्यात यावा ,तसेच जालना जिल्ह्यातील तालुका परतुर येथील बागेश्वरी साखर कारखान्याने ३ हजार १०० रुपये भाव देण्यात यावा, मागच्या वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस लागवड नोंदणी व गाळप करण्यासाठी एकरी घेतलेले १० हजार रुपये अंदाजे ३० कोटी पेक्षा अधिक पैसे वसूल केले होते ते पैसे ऊस तोडणी अगोदर परत करावेत, मागच्या वर्षी बागेश्वरी साखर कारखान्याने ऊस खरेदी करताना गोंधळ केला होता. ऊसतोड प्रोग्राम लेटच्या नावाखाली गोंधळ निर्माण करू नये, मागच्या वर्षी उसाच्या वजन काट्यात घोटाळा झाला होता म्हणून पोलिसात गुन

माध्यमे ही समाज व राज्यकर्त्यांना दिशादर्शक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.

Image
माध्यमे ही समाज व राज्यकर्त्यांना दिशादर्शक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील. ---------------------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र सातारा प्रतिनिधी      ---------------------------------------------------------------------- सातारा दि.29 माधुरी पांडे : समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पद्धतीचे  काम माध्यमांनी करावे असे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन 2022  च्या उद्घाटन प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग आवश्यक लखमापूर येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार.

Image
  गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग आवश्यक लखमापूर येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार. ----------------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   प्रा.आशिष देरकर  ----------------------------------------------------------------- वाल्मिकी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्या. लखमापूर व भोई समाज लखमापूरच्या वतीने गावातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांच्या सत्काराचा कार्यक्रम नुकताच लखमापूर येथे पार पडला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाल्मिकी मत्स्यपालन संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसुरकर होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, जिल्हा स्मार्ट ग्राम बिबीचे माजी उपसरपंच प्रा. आशिष देरकर, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश लोखंडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम पिंपळशेंडे, नवनिर्वाचित सरपंच अरुण जुमनाके, सदस्य शुभम थिपे, आशाताई काकडे, प्रमोद सिडाम, नितीन जुनघरे, दानशूर महिला गिरजाबाई मडावी, देविदास भोयर, वसंता कोंडेकर, कवडू जुनघरे, वाघुजी भोयर, सत्यपाल पिंपळशेंडे, यादव वाघाडे, प्रविण बोम्मावार यांची उपस्थित

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्या .

Image
 शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव द्या . ------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र गणेश चंद्रशेखर -------------------------------------------------------- सलग दोन महिन्यापासून पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शेतकऱ्यांना हमीभाव 7000 ते 8000  हजार प्रमाणे प्रति किटल  मिळाला पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव गणेश चंद्रशेखर यांनी  केली आहे . शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे   असे म्हटले जाते परंतु आजच्या शेतकऱ्यावर स्वतःचा परिवार कसा पोहोचायचा हा खूप मोठा गंभीर प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर उभा राहिलेला आहे कारण जो काही मल शेतकऱ्यांच्या घरी आलेला आहे त्या मालापेक्षा जास्त खर्च शेतकऱ्यांना  करावा लागला लावलेला खर्चापेक्षाही कमी माळ झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठे संकट उभे राहिले आहे तसेच वाढत्या  महागाईला सुद्धा शेतकऱ्यांना तोंड द्यावे प्रत्येक गोष्टीची किंमत ही वाढत आहे परंतु सोयाबीनचा किंवा शेतकऱ्याच्या मालाला कोणीतरी किंमत वाढून मिळत नाही त्यामुळे जगाचा पोशिंदा बळीराजा हा खूप हवालदार झालेला आहे

सातारा: महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी श्रीमती सुमित्रा महाजन.

Image
 सातारा: महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी श्रीमती सुमित्रा महाजन.  ------------------------------------------------------------------------------------------------ ----------------------------------------------------------------------------------------------- सातारा: महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल म्हणून शासनाने सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षा ‌सुमित्रा‌महाजन‌ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.‌सुमित्रा‌महाजन यांचा जन्म १२/०४/१९४३रोजी चिपळूण येथे झाला.वडीलांचे आडनाव ‌साठे असून १९९२ते१९९४ भारतीय जनता पार्टी सेक्रेटरी म्हणून काम केले आहे.१९९५-९६ मध्यप्रदेश सेक्रेटरी.१९९५-१९९८ सेक्रेटरी म्हणून भारतीय जनता पक्षाचे काम केले आहे.१९९८-१९९९ जनरल सेक्रेटरी भारतीय जनता पक्ष. यापूर्वी त्यांनी सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे. उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून  संसदिय कामकाजाबाबत  सन २०२१-२२ चा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.नवीन राज्यपाल यांना फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र यांचे वतीने शुभेच्छा.

सातारा:-सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांचा भ्रष्टाचार थांबवा.

Image
 सातारा:-सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वरिष्ठ अधि कारी यांचा भ्रष्टाचार थांबवा. -------------------------------------------------------------------------------------------------- -------------------------------------------------------------------------------------------------- सातारा:- मागील भागात सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत  बातमी लावली आहे त्याची सखोल चौकशी केली असता जी किलप समोर आली ती आम्ही प्रसारीत केली आहे. परंतु प्रसारित झालेल्या व्हिडिओ क्लिप मधील संवादानुसार झालेल्या कामाचे बरेचसे धागेदोरे आमच्या ‌हाती मिळाले आहेत.सातारा येथे नोंद झालेली वाहने कामासाठी जर परराज्यात असतील तर त्यांच्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करणेसाठी ते वाहन सातारा येथील कार्यालयात तपासणीसाठी आणणे गरजेचे नाही त्यासाठी कायदेशीर तरतुदींनुसार वाहने ज्या राज्यात आहेत तेथीलच जवळच्या आरटीओ कार्यालयात तपासणी करून घेता येतात.व तेथील इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात योग्यता प्रमाणपत्र प्रदान करतात.व अशी तात्पुरत्या स्वरुपाची योग्यता प्रमाणपत्र मुळ नोंदणी प्रा

शेरी मळा पालखी मार्ग पाणंद रस्त्यासाठी 27 लाखाचा निधी मंजूर.

Image
 शेरी मळा पालखी मार्ग पाणंद रस्त्यासाठी 27 लाखाचा निधी मंजूर. ------------------------------------------------------------------------------------------------------------------ --------------------------------------------------------------------------------------------------------------------   सांगवडे ता.29 सतत सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेरी मळा पालखीचा मार्ग खूपच खराब झाला आहे. त्यामुळे चालू हंगामामध्ये त्या परिसरातील शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीस अडचण निर्माण झाल्यामुळे. गावातील  शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक सुकुमार जगनाडे, बाजीराव देसाई यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून दीड लाख रुपये गोळा करून पाणंद रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले होते; पण खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी आ. ऋतुराज पाटील दादा यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती. त्याचा विचार करून तात्काळ पाच ते सहा दिवसांमध्ये शेरी मळा पालखी मार्ग पाणंद रस्त्याची पाहणी आ. ऋतुराज पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी स्वनिधीतून 50 हजार रुपये दिले व मातोश्री पानंद योजनेतून 27 लाखाचा निधी देण्याचे जाहीर

अंतरगावच्या तुझी ओढ गीताची सोशल मीडियावर धूमग्रामस्थांनी वठविली कलाकारांची भूमिका

Image
 अंतरगावच्या तुझी ओढ गीताची सोशल मीडियावर धूमग्रामस्थांनी वठविली कलाकारांची भूमिका ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र                                                                                                                                    चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मंगेश तिखट    --------------------------------- कोरपना - तालुक्यातील अंतरगाव येथील हौशी कलाकारांनी निर्मिलेले ' तुझी ओढ ' गीत रसिकांनी अक्षरशा डोक्यावर घेतले आहे. या गीताने यूथ टूब सह सोशल मीडियावर रसिकाच्या गळ्यातील ताईत बनले गेले आहे. शारोन अँड सांची प्रोडक्शन निर्मित ' तुझी ओढ ' हे गीत रमेश वेट्टी यांनी आपल्या सुमधुर आवाजातून स्वरबध्द केले आहे. या गाण्याला वैभव रामटेके यांचे लिरिक्स लाभले आहे. प्रज्वल भगत, अंकित वडस्कर, शिवाजी लेंनगुरे, सुरज राजूरकर, अमोल कळसकर , गजानन कोल्हे, रुपेश पानघाटे, शशिकांत बोबडे, नितीन मडावी , श्रीकांत पिंपलशेंडे, आकाश चिकाटे, प्रताप वडस्कर, मनोहर वडस्कर, स्नेहदिप खेलुरकर, स्नेहल धोटे, बजरंग मेश्राम, अंकित भोयर, अनिल नक्षिने, संकेत गुरुनूले, प्

खोटी तक्रार दाखल केल्याने अन्यायाला वाचा फोडणार.:- मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांची माहिती.

Image
  खोटी तक्रार दाखल केल्याने अन्यायाला वाचा फोडणार.:- मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांची माहिती . ------------------------------------------------------------------------ ------------------------------------------------------------------------- सातारा:- सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांचेवर कारवाई करावी म्हणून आप'चे सातारा जिल्हा अध्यक्ष सागर भोगावकर यांनी दिलेल्या अर्जावर सखोल माहिती घेतली असता मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांनी सांगितले की, मी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी सातारा यांना मला नाहक बदनाम करुन ऐन दिवाळीत माझी बदनामी केली आहे. वास्तविक मी‌ प्रामाणिकपणे वरीष्ठ अधिकारी यांचे आदेशानुसार काम केले आहे.तरी सुद्धा मला बदनाम करुन वरीष्ठ अधिकारी मला नाहक त्रास देत आहेत. याबाबत शासनाने खरेच सत्य उघडकीस आणावे याबाबत मी दाद मागत आहे.

बळीचा बकरा बनला राहुल नायक.सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील घोटाळा.

Image
 बळीचा बकरा बनला राहुल नायक.सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील घोटाळा. --------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------- सातारा:-सातारा येथील उपप्रादेशिक कार्यालयात कार्यरत असलेल्या राहुल नायक यास कर्मचारी सागर लाळगे व वरिष्ठ अधिकारी विनाकारण बळीचा बकरा असल्याचे समोर आले. यापूर्वी आमच्या चॅनलच्या प्रतिनिधी किरण अडागळे यांनी सखोल माहिती घेतली असता वेगळेच सत्य बाहेर आले आहे.सदर प्रकरणातील कर्मचारी राहुल नायक यास विनाकारण दबाव आणून बळीचा बकरा बनवला आहे.याबाबत  आमचे प्रतिनिधी किरण अडागळे व राहुल टिळक यांनी काही एजंट लोकांना भेटले असता स्वतःचे नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.  सध्या राहुल नायक मानसिक दबावाखाली काम करीत असल्याचे समजते. तसेच कर्मचारी सागर लाळगे हा गायब आहे.सागर लाळगे याचेशी ‌ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु कोणाचीही भेट नाही.परंतु वरीष्ठ अधिकारी एजंटवर दबाव आणत असल्याचे  परिवहन आयुक्त यांनी व  पालकमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालावे अशी आग्रहाची मागणी नागरिकांनी व‌ एजंट ‌यांनी आमचे प्रतिनिधी

बांधकाम मजूर भोजन वितरण महा घोटाळा शासनाच्या निधीचा बट्याबोळ.चौकशी करा, आबिद अली.

Image
 बांधकाम मजूर भोजन वितरण महा घोटाळा शासनाच्या निधीचा बट्याबोळ.चौकशी करा, आबिद अली. ------------------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र प्रतिनिधी ------------------------------------------------------------------- महाराष्ट्र शासनाने कामगारच्या कल्याणासाठी इमारत बांधकाम मंडळाची स्थापना करून कामगार कल्याण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली महामंडळाच्या शासकीय प्रतिनिधी व अशासकीय सद्श्यांची नियुक्ती करून महामंडळ कार्यान्वित करण्यात आले. राज्यातील नोंदणीकृत मजुरांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या शौक्षणिक,आरोग्य,अपघात,निवारा व विमा कवच मजुरांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न शासनांनी चालविला इमारत बांधकाम मजुरांसाठी सेफ्टी कीट व ५००० हजार रुपयाचे अनुदान यापूर्वी वितरीत करण्यात आले होते त्यामध्ये ७५% बनावट मजदूर असून दिलेले सेफ्टी कीट घरात धूळखात पडले आहे. नव्याने शासनांनी इमारत बांधकाम मंडळाकडून मजुरांसाठी भोजन कार्यक्रमाची योजना तयार करून मोठा गैरव्यवहार या योजनेत सुरु असून ज्या गावात कोणतेही इमारती व शासकीय काम सुरु नाही अशा पिपररडा,कुकुड्सात,थुट्रा अशा ठिकाणी मज

` शेतकरी अनुदानापासून वंचित शिधापत्रिकाधारकांना दिवाळी किट मिळालेच नाही दिवाळी अंधारात,राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुहेल अली यांचा आरोप.

Image
 शेतकरी अनुदानापासून वंचित शिधापत्रिकाधारकांना दिवाळी किट मिळालेच नाही दिवाळी अंधारातराष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुहेल  अली यांचा आरोप, ----------------------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मंगेश तिखट  ------------------------------------------------------------- राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुहेल  अली यांचा आरोप शासनाने जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाने नुकसानीचे पंचनामे करून दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादा सहा हजार आठशे ऐवजी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत देण्याची गोड घोषणा केली मात्र दिवाळी साजरी होईल हतबल झालेला शेतकरी मोठ्या आशेने दिवाळी साजरी करण्याचा बेत आखला प्रशासनाकडून गावनिहाय याद्या तयार करून प्रसिद्धी देण्यात आली मात्र अनेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रकमात जमा झाली नसल्याने पावसाने पिकावर पाणी फिरवले तर शासनाने घोषणा करून दिवाळीच्या आनंदावर पाणी फिरवल्याचे चित्र या भागात असून अनेक शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीच्या दिव्या ऐवजी अंधार दिसून आला महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर 2022