Posts

Showing posts from May, 2024

लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने ४५-सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणुक मतमोजणी ही सातारा शहरातील नवीन एम.आय.डी.सी. हद्दीत डी.एम.ओ. गोडावुन येथे.

Image
  लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने ४५-सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणुक मतमोजणी ही सातारा शहरातील नवीन एम.आय.डी.सी. हद्दीत डी.एम.ओ. गोडावुन येथे. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी अमर इंदलकर  ----------------------  दि.०४/०६/२०२४ रोजी होणार आहे.या मतमोजणीचा निकाल ऐकण्याकरीता मोठया प्रमाणावर लोकांची गर्दी होणार असलेने डी.एम.ओ. गोडावुन परिसरात मतमोजणी कालावधीत वाहतुक व्यवस्थेत बदल केला जात आहे. पोलीस अधीक्षकांनी पुढील प्रमाणे जाहीर केले.       पोलीस अधीक्षक यांना सातारा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये दि.०३/०६/२०२४ रोजीचे ११.५५ वा. पासुन ते दि.०४/०६/२०२४ रोजीचे रात्रौ २०.०० वा.पर्यंत खालीलप्रमाणे वाहतुकीत बदल करीत आहे याची नोंद घ्यावी. वाहतुकीकरीता बंदी घालणेत आलेला मार्ग- दि.०३/०६/२०२४ रोजीचे ११.५५ वा. पासुन खालील नमुद मार्गावर वाहतुकीकरीता बंदी करणेत येत आहे. १) वेणुगोपाल फुड्स (पारले कंपनी) ते कवित्सु कंपनी युनिट नं. २ कंपनीकडे डी.एम.ओ. गोडावुन समोरुन येणारे ज...

सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमानाने सातारा जिल्हयातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना ४५ दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण.

Image
  सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमानाने सातारा जिल्हयातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना ४५ दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण. ------------------------------------- फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी अमर इंदलकर  ------------------------------------        सातारा जिल्हयातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार अशा तरतुदी करणेसाठी उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सातारा जिल्हयातील १८ ते ३५ या वयोगटातील युवक, युवती व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.      दिनांक ३०/०५/२०२४ रोजी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, अहमदनगर यांचे माध्यमातुन ४५ दिवसांचे प्रशिक्षणाकरीता सातारा जिल्ह्य...

कौलवच्या डॉ सुरेश अंबाजीराव पाटील यांनी केलं मरणोत्तर नेत्रदान.

Image
  कौलवच्या डॉ सुरेश अंबाजीराव पाटील यांनी केलं मरणोत्तर नेत्रदान. ------------------------------- कौलव प्रतिनिधी  संदीप कलिकते ------------------------------- कौलवचे सुपुत्र डॉ.अशोकराव अंबाजी पाटील यांचे नुकतेच निधन झाले.कोगनोळी,कसबा बावडा,देवकर पाणंद, कोल्हापूर येथे त्यांनी गेली ४०वर्षे वैद्यकिय सेवा दिली.ते सुपरिचित व सेवाभावी डॉक्टर होते.        अलिकडे ते काही दिवस आजारी होते.त्यांचे परवा निधन झाले.त्यांचे वय ७५ वर्षे होते.मृत्यू पश्चात त्यांचे नेत्रदान करण्यात आले.त्यांच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आला.हा प्रकाश देण्याचे महत्वपूर्ण काम सांगलीच्या "नंदादीप आय केअर सेंटर ने केले. यासाठी डॉ. अशोक पाटील यांची कन्या डॉ. मनिषा रणधीर ढोबळे व कोल्हापूरचे प्रसिद्ध डॉ. रवींद्र शाम येडेकर यांची यामधील भूमिका महत्वाची होती.कौलव मधील. त्यांचे भाऊ श्री.शिरीष अंबाजी पाटील (सेवानिवृत्त कृषी अधिकारी) श्री.रमेश अंबाजी पाटील ( पूजा नर्सरी ) ,मुलगा श्री.महेंद्र अशोकराव पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून नेत्रदानाचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.... ...

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक समाविष्ट करून देणार नाही.. प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष राजन कदम.

Image
  शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक समाविष्ट करून देणार नाही.. प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका युवक अध्यक्ष राजन कदम. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम ---------------------------------- तिसरी ते बारावी शालेय अभ्यासक्रमात पुन्हा मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करण्याचे आराखडा तयार केल्या कारणावरून संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे कारण या भारत देशामध्ये असणाऱ्या शूद्र आणि स्त्रियांचे शोषण थांबवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर 25 डिसेंबर 1927 रोजी जनसमुदायाच्या उपस्थितीत मनुस्मृतीच दहन करण्यात आले होते आता पुन्हा एकदा विद्यार्थी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृति समाविष्ट केल्यास आपल्या देशात पुन्हा स्त्रियांचे शोषण आणि सुधारणा गुलामगिरीचे जीवन जगावे लागेल म्हणून सरकारला आणि पाठ्यपुस्तक मंडळला आव्हान करण्यात येते की मनुस्मृतीतील श्लोकाचा समावेश केल्यास देशभरातील आणि राज्यातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन आंदोलन करून मनुस्मृतिदन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका...

दहावीचे वर्ष हे विद्यार्थी जीवनाला दिशा देणारे वर्ष....शिक्षक आमदार किरणराव सरनाईक.

Image
  दहावीचे वर्ष हे विद्यार्थी जीवनाला दिशा देणारे वर्ष....शिक्षक आमदार किरणराव सरनाईक. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत सिंग ठाकूर  ----------------------------- दहावीचे वर्ष हे विद्यार्थी जीवनाला दिशा देणारे वर्ष असून हे वर्षच विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्या दिशेने जाणार हे ठरविण्यासाठी उपयुक्त ठरते असे प्रतिपादन स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे वर्ग  दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक यांनी केले. श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे दिनांक 28  मे 2024 रोजी इयत्ता  दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिम चे अध्यक्ष तथा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये स्थानिक ...

खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते कु. पूनम केशव गरकळ चा सत्कार.

Image
  खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते कु. पूनम केशव गरकळ चा सत्कार.  ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड प्रतिनिधी  रणजीत ठाकूर. ---------------------------- नुकताच अमरावती विभागीय बोर्डाचा एस.एस.सी (दहावी) निकाल जाहीर झालाय. रिसोड येथील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पूनम केशव गरकळ हिनै दहावीत 93.20 टक्के गुण पटकावून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल वाशिम यवतमाळ लोकसभेच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते रिसोड येथील त्यांच्या खासदार कार्यालयात सत्कार करण्यात आला. कु. पुनम गरकळ हिला विषय निहाय मराठीत 85%, हिंदी संस्कृत 95%, इंग्रजीत 88 %, गणित 98%, विज्ञान 95%, समाजशास्त्र 90 % एकूण 500 माकपैिकी 466 मार्क्स म्हणजे 93.20% गुण प्राप्त करीत घवघवीत यश संपादन केले आहे.   यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे,जाधव सर, वंजारी महासंघाच्या महिला जिल्हा अध्यक्षा अपर्णा जायभाये गरकळ, केशव गरकळ, माया गरकळ यांच्यासह वंजारी समाजाच्या महिला उपस्थित होत्या. खासदार भावनाताई गवळी यांनी कु. पूनम गरकळ हिचा ...

युवासेना कोल्हापूर (ठाकरे गट) आयोजित भव्य बॉक्सिंग स्पर्धा जोरदार संपन्न.

Image
  युवासेना कोल्हापूर (ठाकरे गट) आयोजित भव्य बॉक्सिंग स्पर्धा जोरदार संपन्न. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर प्रतिनिधी रोहन कांबळे  -------------------------------  कोल्हापुरातील खेळाडूंच्या कलेला वाव देण्यासाठी कोल्हापूर युवा सेनेच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम युवक व युवतींसाठी होत असतात. याच हेतूने कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील बॉक्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी आज युवासेना तसेच स्वर्गीय.लता देवी लोहिया स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित बॉक्सिंग स्पर्धा पार पडली.१४व १७ वर्षाखालील या स्पर्धेमध्ये ८० खेळाडूंनी भाग घेतला होता.  यामध्ये क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक मुली- स्वरा रणजित जाधव, सायली सतीश कोरे,लावण्या सतीश पाटील,पूर्वा चंद्रकांत मालकर  द्वितीय क्रमांक मुली-पूर्वा रणजित जाधव,जानवी संतोष भारमल, स्नेहा पाटील असे आहेत. या स्पर्धेचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी केले होते. ही स्पर्धा कोल्हापूर शहरातील दि न्यू एज्युकेशन सोसायटी पेटाळा परिसरात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा...

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी.

Image
  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी. ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  लोहा प्रतिनीधी  अंबादास पवार  ---------------------------- दि.४ बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे होणार आहे. या मतमोजणीसाठी करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आढावा घेतला. तसेच मतमोजणी कक्षाची पाहणी करून अनुषंगिक सूचना दिल्या. अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, प्रियांका आयरे, नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, शरद झाडके, सुशांत शिंदे, मंजुषा लटपटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मतमोजणीसाठी सहा विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक कक्षात 14 टेबलवर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. तसेच टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारीचा ज...

पासिंगच्या दंडाविरोधात आप'चा ठिय्यादंडात्मक कारवाई थांबवा, अन्यथा मोर्चा काढू - आम आदमी रिक्षाचालक संघटनेचा इशारा.

Image
  पासिंगच्या दंडाविरोधात आप'चा ठिय्यादंडात्मक कारवाई थांबवा, अन्यथा मोर्चा काढू - आम आदमी रिक्षाचालक संघटनेचा इशारा. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर प्रतिनिधी  रोहन कांबळे  ----------------------------- पासिंग न झालेल्या रिक्षा वाहनासाठी दररोज पन्नास रुपये विलंब शुल्क आकारावे असे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाने काढले आहे. अशाप्रकारे केलेली दंडात्मक कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत आम आदमी रिक्षाचालक संघटनेने आरटीओ कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. एकीकडे रिक्षाचे हफ्ते, विविध कर, इन्शुरन्स भरत व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना कोरोनाच्या काळात आपले काम बंद ठेवावे लागले. संसाराचा गाडा हाकत असताना मुलांचे शिक्षण, आजारपण या सगळ्यासाठी आर्थिक तरतूद रिक्षाचालकांना करावी लागते. त्यातून सावरत असताना अशाप्रकारची दंडात्मक कारवाई करून रिक्षा व्यवसाय संपवण्याचा डाव सरकार आखात असल्याचा आरोप आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला. हा निर्णय मागे न घेतल्यास मोर्चा काढण्याचा इशारा देसाई यांनी दिला. यावेळी आप रिक्षा आघाडी अध्...

ओलवण भटवाडी बॅक वॉटर मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मायालेकीसह तिघांचा दुदैवी अंत .

Image
  ओलवण भटवाडी बॅक वॉटर मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मायालेकीसह तिघांचा दुदैवी अंत. -------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे --------------------------- राधानगरी तालुक्यातील ओलवनभटवाडी येथील बॅक वॉटर ला हातकणंगले तालुक्यातील तळदंगे गावामधील मायालेकीसह भैरीबांबर येथील मुलग्याचा अशा तिघांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत अधिक माहिती राधानगरी तालुक्यातील ओलवान पैकी भटवाडी येथे फिरण्यासाठी आलेल्या सतीश लक्ष्मण टिपू ग डे वर्ष 35 राहणार भैरी बांबर तालुका राधानगरी अश्विनी राजेंद्र मालवेकर वर्ष 32 व प्रतिक्षा राजेंद्र मालवेकर वय वर्ष तेरा या दोघीजणी राहणार सावर्डे तालुका कागल सध्या राहणार तळंदगे तालुका हातकणंगले हे तिघेजण पोहोण्यासाठी गेले असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते तिघेजण बुडून मयत झाले आहेत त्यांचे मृतदेह तरंगत असल्याचे दिसल्यावर ते मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टम साठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात आणले आहे त्याबाबत अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे करत आहेत

पासिंगच्या दंडाविरोधात आप'चा ठिय्यादंडात्मक कारवाई थांबवा, अन्यथा मोर्चा काढू - आम आदमी रिक्षाचालक संघटनेचा इशारा.

Image
  पासिंगच्या दंडाविरोधात आप'चा ठिय्यादंडात्मक कारवाई थांबवा, अन्यथा मोर्चा काढू - आम आदमी रिक्षाचालक संघटनेचा इशारा. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर प्रतिनिधी  रोहन कांबळे ------------------------------ पासिंग न झालेल्या रिक्षा वाहनासाठी दररोज पन्नास रुपये विलंब शुल्क आकारावे असे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाने काढले आहे. अशाप्रकारे केलेली दंडात्मक कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत आम आदमी रिक्षाचालक संघटनेने आरटीओ कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. एकीकडे रिक्षाचे हफ्ते, विविध कर, इन्शुरन्स भरत व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना कोरोनाच्या काळात आपले काम बंद ठेवावे लागले. संसाराचा गाडा हाकत असताना मुलांचे शिक्षण, आजारपण या सगळ्यासाठी आर्थिक तरतूद रिक्षाचालकांना करावी लागते. त्यातून सावरत असताना अशाप्रकारची दंडात्मक कारवाई करून रिक्षा व्यवसाय संपवण्याचा डाव सरकार आखात असल्याचा आरोप आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला. हा निर्णय मागे न घेतल्यास मोर्चा काढण्याचा इशारा देसाई यांनी दिला. यावेळी आप रिक्षा आघाडी अध्यक्ष ...

सांगली मधील अति धोकादायक इमारतीच्या भाग केला पूर्णपणे पाडण्यात आला.

Image
  सांगली मधील अति धोकादायक इमारतीच्या भाग केला पूर्णपणे पाडण्यात आला. ----------------------------------- मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम  ----------------------------------- सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारती निष्कर्षित करण्याचे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारतीची निष्कर्षित करण्याची मोहीम सुरू आहे. प्रभाग एक अंतर्गत 40 धोकादायक इमारतीपैकी तीन इमारती या अति धोकादायक मध्ये आहेत यापैकी एक इमारतीचा पुढील धोकादायक भाग आज महापालिकेने निकषित केला उप आयुक्त वैभव सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश मदने स्वच्छता निरीक्षक प्रणाली माने धनंजय कांबळे वैभव साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी आवजारे वाटप.

Image
  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी आवजारे वाटप. ------------------------------ करवीर प्रतिनिधी  रोहन कांबळे ------------------------------ आज कोल्हापूर येथे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ५०% सबसिडी मध्ये पावर टेलर रोटावेटर व कृषी अवजारे  प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थित कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मा.सुनील शिंत्रे सर, युवासेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील , राधानगरी विधानसभा संघटक सागर भावके, गडहिंग्लज महिला शहर संघटीका स्वरूपा पेंडुरकर, विहान ऍग्रो एजन्सी'चे कुलदीप पडळकर उपस्थित होते.

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून भुयारी न्यायाचे स्वच्छता अंतिम टप्प्यात.

Image
  सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून भुयारी न्यायाचे स्वच्छता अंतिम टप्प्यात. ------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी    राजू कदम  ------------------------- महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आरोग्य विभागाकडून महापालिका क्षेत्रात शहरातील भुयारी नाल्याची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे यामध्ये मारुती रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील अंतर्गत भुयारी गटारी स्वच्छता केल्या जात असून या गटारी मधील साचलेल्या गाळ हा आरोग्य विभागाकडून बाहेर काढला जात आहे या परिसरातील भुयारी नाल्यांमधील गाळ काढल्यामुळे संभाव्य मान्सून मध्ये या परिसरात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाचे पाणी तात्काळ निचरा होण्यास मदत होणार आहे त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास काहीसा संपुष्टात येणार आहे त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता निरीक्षक प्रणाली माने ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी या कामाला भेट देत ...

कोल्हापूर शहर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सदस्य पदी संभाजी साळुंखे.

Image
  कोल्हापूर शहर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सदस्य पदी संभाजी साळुंखे. --------------------------- कोल्हापूर प्रतिनिधी  विजय बकरे --------------------------- कोल्हापुर शहर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची मासिक सभा घेण्यात आली त्यामध्ये संभाजी साळुंखे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली या मासिक सभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच चालू शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये नाईट हायस्कूल कोल्हापूरचे लिपिक संभाजी एकनाथ साळुंखे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली यावेळी राहुल चोपडे संतोष संकपाळ योगेश शेटे मनोहर जाधव प्रताप जगतापप्रशांत पवार रणजीत सदामते प्रताप पाटील सनी राज नलवडे मारुती कांबळे नामदेव पाटील गड्डी सर व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते

कोल्हापूर पोलीस दलाचे वार्षिक पथ संचलन. निरीक्षणा वेळी मा. विशेष पोलीस महा निरीक्षक, श्री सुनिल फुलारी यांनी केले कौतुक.

Image
  कोल्हापूर पोलीस दलाचे वार्षिक पथ संचलन. निरीक्षणा वेळी मा. विशेष पोलीस महा निरीक्षक, श्री सुनिल फुलारी यांनी केले कौतुक. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ---------------------------------- आज दिनांक २९/०५/२०२४ रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनिल फलारी सो यांनी, कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण केले. सकाळी ०७.०० वा. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना पोलीस मुख्यालय परेड ग्राऊंड येथे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी मानवंदना दिली. त्यानंतर दिमाखदार व शिस्तबद्ध संचलनाचे नेतृत्व कोल्हापूर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक यानी केले. परेड ग्राऊंड येथे पोलीस विभागाकडुन विविध प्रत्याक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये कवायत, स्कॉड ड्रिल, शस्त्र कवायत, क्युआरटी पथकाचे टॅक्टीकल (दहशतवादी हल्ला परतवण्याचे) कवायत, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, बॅन्ड पथक अशा विविध कवायतीचे सादरीकरण कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने केले. मा. ...

कोयना धरणग्रस्त महासंघ यांचा अनोखा उपक्रम.

Image
  कोयना धरणग्रस्त महासंघ यांचा अनोखा उपक्रम. -------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोयना प्रतिनिधी  --------------------------      कोयना धरणग्रस्त महासंघ अनेक वर्षे आपल्या माध्यमातून लोकहिताचे उपक्रम राबवित असतात त्यातीलच एक उपक्रम म्हणजे या वर्षी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने महासंघाशी संलग्न असणाऱ्या चारही गावात लहान मुलांची निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत अनेक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला होता.महासंघाच्या पदाधिकारी यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थी यांना पारितोषिक देण्याचे योजले होते .त्यानिमित्ताने खिरखंडी गावच्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यांना पारितोषिक वितरण करण्यासाठी कोयना धरणग्रस्त महासंघाचे पदाधिकारी खिरखंडी गावी उपस्थित झाले होते.खिरखंडी बौद्धजन विकास मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मंडळ यांनी महासंघाच्या पदाधिकारी यांचे स्वागत केले आणि त्यांनी हाती घेतलेल्या अनेक उपक्रमाचे कौतुक देखील केले लहान मुलांना बक्षीस वाटप केल्याबद्दल खिरखंडी ग्रामस्थांनी महासंघाचे आभार मानले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या या...

राष्ट्रीय महामार्ग - तावडे हॉटेल येथे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन च्या वतीने सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Image
  राष्ट्रीय महामार्ग - तावडे हॉटेल येथे महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन च्या वतीने सर्वपक्षीय धरणे आंदोलन. --------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  शिरोली प्रतिनिधी  अमित खांडेकर  --------------------------------- आज बुधवार दि. 29 मे 2024 रोजी सकाळी 11 च्या सुमारास तावडे हॉटेल येथे पंचगंगा नदी पुलाशेजारी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन च्या वतीने शासकीय पाणीपट्टी दरवाढ व कृषीपंपाना जलमापक यंत्र बसविणे विरोधात सर्वपक्षीय राष्ट्रीय महामार्ग रोको व चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते. परंतु आचारसंहिता असल्याने पोलीस प्रशासनाने महामार्ग रोखण्यास परवानगी नाकारली.त्यामुळे आंदोलन कर्त्यांनी सेवा रस्त्यावर दर्ग्यासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमिक मोर्चा चे भारत पाटणकर,आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील,आमदार अरूणदादा लाड,माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. या आंदोलनात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. कृषीपंपाची शासकीय दहापट पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी.राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग जोपर्यंत घनमीटर पध्दतीने पाणी वाटप करत नाही,तोपर्यंत कृषिप...

कोल्हापुरातील ग्रामीण परिसरात होणारा परप्रांतीय मुलींचा नंगानाच थांबवावा– यावसेना कोल्हापूर.

Image
  कोल्हापुरातील ग्रामीण परिसरात होणारा परप्रांतीय मुलींचा नंगानाच थांबवावा– यावसेना कोल्हापूर. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  गरुडभरारी प्रतिनिधी रोहन कांबळे. ------------------------------- कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जत्रा, यात्रा, उरूस या निम्मिताने नृत्याच्या नावाखाली ट्रॉली शो ,रोड शो मोठ्या प्रमाणात होतात.तसेच तोगड्या कपड्यामध्ये ग्रुप डान्सच्या नावाखाली फक्त मुली नाचवल्या जातात.  त्या मुली नृत्याच्या नावाखाली निव्वळ नंगानाच करतात.ही जणु अलीकडच्या हुल्लडबाजांनी प्रथा पाडली आहे.  वाढते बलात्कार, महिला अत्याचार ही भीती -चिंता सर्वत्र होत असतानाच या नंगानाच प्रकारांना या शोज मुळे पाठबळ मिळत आहे.यामध्ये संबंधित मुली ट्रॉलीवर उभे राहून गल्लो - गल्ली चौका -चौकात सर्वांकडे पाहून अश्लील हावभाव करत असतात आणि याच्यावर मध्यधुंद होऊन तरुणाई नाचत असते. या कृत्यातून छत्रपती शाहूंच्या या नगरीने काय वारसा घ्यायचा? अशा शोज मुळे प्रामाणिक नृत्य करणारे नृत्य कलाकार वंचित राहत असून आज बेरोजगार आहेत. पण त्यांनी कलेशी प्रामाणिक राहून कुठलाही असा...

रिक्षाचालकांना त्रास देणाऱ्या सावकारांना आळा घाला - आप'ची अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडे मागणी.

Image
  रिक्षाचालकांना त्रास देणाऱ्या सावकारांना आळा घाला - आप'ची अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडे मागणी. ---------------------------------- गरुडभरारी प्रतिनिधी  रोहन कांबळे ----------------------------------- खाजगी सावकारी सारखे अवैध व्यवसाय जिल्ह्यात वाढत आहेत. चारच दिवसांपूर्वी एका खाजगी सावकाराने केलेल्या मारहाणीत राकेश माने या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. गेल्या दोन महिन्यात खाजगी सावकारीच्या पाशात अडकून मृत्युमुखी पडलेला हा तिसरा रिक्षाचालक आहे. याआधी फुलेवाडी येथील अमित पाटील व बोन्द्रेनगर येथील प्रीतम पाटील या तरुण रिक्षाचालकांनी सावकाराच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली आहे. खाजगी सावकरीच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी आम आदमी रिक्षाचालक संघटनेने अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.  बदनामीच्या भीतीने अनेकजण याबाबत पोलिसांना कळवत नाहीत. त्यामुळे पीडित रिक्षाचालकांनी तक्रारीसाठी पुढे यावे असे जाहीर आवाहन पोलिसांनी आपल्या स्तरावरून करावे, तसेच अशा प्रकारचे अवैध व्यवसाय बंद व्हावेत यासाठी पोलीस यंत्रणेने सक्षम पावले उचलून रिक...

महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिके.

Image
  महानगरपालिका अग्निशमन विभागाची पंचगंगा घाटावर अग्निशमन, शोध व बचावाची प्रात्यक्षिके. आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज. कोल्हापूर ता.27 : संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून आज पावसाळ्यापुर्वी अग्निशमन विभागाकडुन अग्निशमन, शोध व बचाव कार्याची प्रात्याक्षिके पंचगंगा नदी घाट येथे सादर झाली. या प्रात्याक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील आत्यधुनिक साधन सामुग्रींचे प्रत्याक्षिक प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांच्या समोर मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे यांनी दाखविले.             यावेळी प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना पुराच्या काळात आपत्ती येणार हे गृहित धरून महापालिका उपायोजना आणि नियोजन करते आहे. याचाच एक भाग म्हणून आज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या साधन सामुग्रीच्या सर्व यंत्रणांचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. पावसाळयापुर्वी शहरातील नाले सफाई, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक होर्डिंगवर, धोकादायक इमारतीवर कारवाई सुरु आहे. आपत्ती काळात महापालिकेच्या यंत्रणेसोबत महाराष्ट्र सोल्जर ...

वडगांव हायस्कूल वडगांवच्या १९९९ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.तब्बल 25 वर्षानंतर एकत्र आले मित्र-मैत्रिणी.

Image
  वडगांव हायस्कूल वडगांवच्या १९९९ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.तब्बल 25 वर्षानंतर एकत्र आले मित्र-मैत्रिणी. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर प्रतिनिधी रोहन कांबळे -------------------------------- हातकणंगले तालुक्यातील वडगाव हायस्कूल वडगावच्या १९९९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा वडगांव येथील हॉटेल जिप्सी मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न पार पडला सुरुवातीला सर्वांनी आपापला परिचय करून दिला त्यामध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर प्रत्येकाने आपले करियर आपआपल्या क्षेत्रामध्ये मिळवले कोण डॉक्टर, पत्रकार, सिव्हिल इंजिनिअर, फॅशन डिझायनर,शिक्षक, व्यावसायिक नोकरी, शेती अशा क्षेत्रात करिअर केले आहे असे सर्वांनी एकत्र येऊन गप्पागोष्टी करून आनंद उत्सव साजरा केला कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा भूतकाळाच्या शाळेचे जुन्या आठवणी ताज्या झाल्या जाणवली तिथे एक गोष्ट जाणवली ती अशी की जुने पण दुरावलेले स्नेही पुन्हा एकत्र आणण्याचा संकल्प सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष करून दाखवला आभासी मैत्रीतआता अशा मेळाव्...

चिमुकलीच्या उपचारासाठी मिळाले समरजितसिंह घाटगेंचे सहकार्य मदतीबद्दल आभार मानून व्यक्त केली कृतज्ञता.

Image
  चिमुकलीच्या उपचारासाठी मिळाले समरजितसिंह घाटगेंचे सहकार्य मदतीबद्दल आभार मानून व्यक्त केली कृतज्ञता. --------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मुरगुड,प्रतिनिधी  जोतीराम कुंभार ---------------------------------------   समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्न व सहकार्याने सुरुपली (ता.कागल)येथील दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीस ह्दय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक  मदत मिळाली. सृष्टी बाबुराव कुंभार असे तिचे नाव आहे.मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल नातेवाईकांनी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.   सुरुपली ता. कागल येथील  बाबुराव कुंभार यांची दीड,वर्षाची मुलगी सृष्टीच्या हृदयाला तीन छिद्रे होती.त्यामुळे ती सतत आजारी असायची.बेळगाव येथील  रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी सात लाख रुपये खर्च आला. मुख्यमंत्री सहायता निधीतून या उपचारासाठी शासनाकडून मदत मिळावी.यासाठी त्यांनी श्री घाटगे यांची भेट घेतली.त्यानुसार श्री घाटगे  यांनी पाठपुरावा केला व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत त्यांच्य...

उचगावातील मनेर मळ्यात पन्नास हजारांची चोरी.

Image
  उचगावातील मनेर मळ्यात पन्नास हजारांची चोरी. ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  --------------------------- गांधीनगर:- बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 50 हजार रुपयांसह  मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. याबाबतची फिर्याद प्रकाश तानाजी कोनोजी (रा. इंद्रजीत कॉलनी मनेर माळ उचगाव ता करवीर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. प्रकाश कोनोजीसह कुटुंबीय हे रविवारी रात्री आपल्या घरातील खालच्या खोलीस कुलूप घालून बिल्डिंगच्या टेरेसवर झोपले होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने रविवारी रात्री साडेअकरा ते सोमवारी पहाटे च्या सुमारास घराच्या दरवाजाचे कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. मधल्या खोलीतील कपाटा मधील ठेवलेले रोख रक्कम आणि दागिने असा 50 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले. पण थोड्या अंतरावर माग काढत श्वान तिथेच घुटमळले. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करत आहेत.

गांधीनगर परिसरात एसएससी परीक्षेत मुलींचीच बाजी.

Image
  गांधीनगर परिसरात एसएससी परीक्षेत मुलींचीच बाजी. ------------------------------- फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  ------------------------------- गांधीनगर:- गांधीनगर परिसरात झालेल्या साधू वासवानी हायस्कूल 4102 आठ केंद्रातील शाळेत एस.एस.सी परीक्षेत केंद्रात गांधीनगर हायस्कूलची ऋतिका यशवंत गिडवाणी या विद्यार्थिनीने 94.60% गुण तर न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगीची आदिती यल्लाप्पा मुर्डेकर हिने 94.60%, तर बापूसो पाटील हायस्कूल वसगडे या शाळेचा विद्यार्थी श्रेयश राजेंद्र जोगम यांने 94.60% गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. या केंद्रात मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.  गांधीनगर केंद्रात आठ शाळेंचा समावेश आहे . यापैकी छ. युवराज शाहू महाराज हायस्कूल गांधीनगर या शाळेचा निकाल 93.10% लागला. यामध्ये रोशनी नंदलाल केसवानी 90.80%, गुण मिळवले. न्यू इंग्लिश स्कूल गडमुडशिंगी शाळेचा निकाल 96.46% लागला.यात अदिती यल्लाप्पा मुर्डेकर 94.60%, गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. समर्थ विद्यालय उचगाव शाळेचा निकाल...

टस्कर हत्तीचा बंदोस्त करण्यात यावा हसणे ग्रामस्थांची मागणी.

Image
  टस्कर हत्तीचा बंदोस्त करण्यात यावा हसणे ग्रामस्थांची मागणी. ------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------------- राधानगरी तालुक्यातील हसणे येथे टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला असून त्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी हसणे ग्रामस्थांनी दाजीपूर येथील वन्यजीव अधिकाऱ्यांना एका निवेदन द्वारे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गेली पंधरा दिवस टस्कर हत्ती चंद्रगड मार्गे दाजीपूर जंगलामध्ये आला असून तो टस्कर हत्ती हसणे गावा तील देवराई मध्ये ठाण मांडून असल्याने हसणे गावातील शेतकऱ्यांची केळी बांबू फणस भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे तसेच गांगोबा मंदिराचा वर्धापन दिन दिनांक 24 ते 26 मे रोजी होणार होता त्यासाठी अमेरिका ऑस्ट्रेलिया सिडनी दिल्ली मुंबई पुणे नाशिक कोकण येथून माहेर वाशि न व चाकरमाने आले होते परंतु चंदगडहून आलेला ठस्कर हत्तीने धुमाकूळ घालत असल्याने त्या भीतीपोटी माहेर वाशि न चाकरमान्य निराशा झाल्याने हसणे ग्रामस्थांनी गांगोबा मंदिराचा वर्धापन दिन दिनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला अ...

सिंगल युज प्लास्टिक दंडात्मक कारवाई सात लाख दंड वसूल 652 किलो प्लास्टिक जप्त.

Image
  सिंगल युज प्लास्टिक दंडात्मक कारवाई सात लाख दंड वसूल 652 किलो प्लास्टिक जप्त. --------------------------- मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम  --------------------------- सिंगल युज प्लास्टिक वापर बंद करावा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार ---वैभव साबळे ऐकतो तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपक्रम आयुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांनी सिंगल युज प्लास्टिक वापर करणाऱ्या आस्थापना यांची तपासणी अन्य दंडात्मक कारवाई करताना सात लाख रुपये दंड आकारणी करून कारवाई क** केले आहे. दिनांक 5/3/2024 पासून कारवाई सुरू करून आज अखेर 652 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे सदरच्या दंडाच्या रकमेचा पर्यावरण संवर्धनासाठी वापर करण्यात येणार आहे गटारी व नाले मध्ये सिंगल युज प्लास्टिक वापर वाढल्यामुळे सांडपाणी वाहून नेण्याची प्रक्रियेस अडथळा निर्माण जास्त प्रमाणात होत असल्याचे आढळून आले आहे पर्यावरणामध्ये प्लास्टिक वापर वाढल्याने  शासनाने महाराष्ट्र अविघटन अशिल कचरा नियंत्रण नियम 2006 अंतर्गत महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना 2018 चे उल्लं...

महानगरपालिकेकडून 30 विना परवाना कॉफी शॉप ना नोटीस देण्यात येणार आहे.

Image
  महानगरपालिकेकडून 30 विना परवाना कॉफी शॉप ना नोटीस देण्यात येणार आहे. ------------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम  ------------------------------------------ आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपासणी विना परवाना कॅफे शॉप ना नोटीस देणार आहेत. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कडून मनपा क्षेत्रातील कॉफी शॉप चे तपासणी सुरू करण्यात आले आहे. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार शुक्रवारपासून आयुक्त शिल्पा दरेकर व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे दोन दिवसांमध्ये महापालिकेने 30 हून अधिक कॉफी शॉपची तपासणी पूर्ण केले आहे महापालिका प्रशासनाकडून मनपा क्षेत्रातील कॉफी शॉप चे तपासणी मोहीम हाती घेण्यात आले आहे तपासणी मोहिमेला कालपासून सुरुवात झाले आहे तपासणी मोहिमात महापालिकेच्या पथकाने कॉलेज कॉर्नर परिसरातील दोन कॉफी शॉपला भेट देत तेथील अंतर्गत रचनेची तपासणी केली त्याचबरोबर सदर ...

मौजे कोरेगाव ता. कराड येथे वार्षिक यात्रेत हातात पिस्टल घेऊन वावरणारे युवकास कराड स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात.

Image
मौजे कोरेगाव ता. कराड येथे वार्षिक यात्रेत हातात पिस्टल घेऊन वावरणारे युवकास कराड स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात. --------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी  अमर इंदलकर. --------------------------------------------     कोरेगाव तालुका कराड गावचे यात्रेमध्ये हातात पिस्टल घेवून वावरणा-या युवकाकडून एका काडतुसासह पिस्टल हस्तगत केले.        याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे कोरेगांव, ता. कराड येथे गांवचे वार्षिक यात्रेमध्ये जमलेल्या गर्दीमध्ये एक युवक हातात पिस्टल घेवून वावरत असलेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना खास बातमीदारामार्फत प्राप्त झालेली होती, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांनी सुचना देवून मौजे कोरेगांव, ता. कराड या गांवचे परिसरात पेट्रोलिंग करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.      दिनांक २५/०५/२०२४ रोजी रात्रीचे सुमारास स्...

राधानगरी तालूक्यातील तिटवे येथे विहीरीत पाय घसरून पङल्याने शेतकर्‍याचा मुत्यु.

Image
  राधानगरी तालूक्यातील  तिटवे येथे  विहीरीत पाय घसरून पङल्याने शेतकर्‍याचा मुत्यु. ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ----------------------------    शेतात ऊसाला पाणी पाजण्यासाठी जात आसतानां विहीरीत  पाय घसरून पङल्याने राजेंद्र  बाबूराव पाटील वय  45  रा. तिटवे ता. राधानगरी या शेतकर्‍याचा दूर्देवी मूत्यू झाला. ही घटना काल रात्री  मानकांङ नावाच्या शेतात घङली.त्यांच्या मूत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. तसेच तो स्वाभिमानी दूध ङेअरीचा चेअरमन होता.     राजेंद्र पाटील हे आपल्या मानकांड नावाच्या शेतात ऊसाला पाणी पाजण्यासाठी काल रात्री  गेले होते. शुक्रवार ते रविवारी हे  तीन दिवस दिवसा लाईट शेती साठी मिळते.गेल्या चार दिवसापूर्वी वादळी वाऱ्याने वीज पुरवठा खंडित झाला तो मंगळवार दि.27मे सांय.पाच ते सात या वेळेसाठी वाढवून देण्यात आला होता. त्यामुळे सायंकाळी  पाच वाजता शेतात पाणी पाजण्यासाठी गेला होता.यावेळी...

प्रतापराव भाऊंच्या स्मरणार्थ ग्रंथालयास पन्नास हजारांची ग्रंथसंपदा प्रदान.

Image
  प्रतापराव भाऊंच्या स्मरणार्थ ग्रंथालयास पन्नास हजारांची ग्रंथसंपदा प्रदान. ---------------------------------------  वाई प्रतिनिधी   कमलेश ढेकाणे  --------------------------------------- भुईंज : ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या सारखे सत्शील, सुसंस्कृत आणि निर्मळ नेतृत्व दुर्मिळ असंच होते. त्यांच्या जाण्याने झालेली हाणी कधीच भरून येणार नसली तरी त्यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही भुईंज गावचे सरपंच विजय वेळे यांनी भुईंज येथे बोलताना दिली. सरपंच, आमदार, मंत्री, खासदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भुषवलेले ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने भुईंज ग्रामपंचायतीच्या वतीने ५० हजार रुपये किमतीची ग्रंथसंपदा आझाद मोफत वाचनालयाच्या राजेश स्वामी ग्रंथालयास भेट दिली. त्याप्रसंगी सरपंच वेळे बोलत होते. या ग्रंथ संपदेत स्पर्धा परीक्षेसह अत्यंत दर्जेदार अशा बालसाहित्याची पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अनमोल ग्रंथसंपदा तसेच इतर दर्जेदार साहित्यिक पुस्तकांचा...

रयत शिक्षण संस्थेचे मेरू विद्यामंदिर वाघेश्वर ता.जावली येथे 36 वर्षानंतर पुन्हा भरली माजी वि‌द्यार्थ्यांची शाळा.

Image
  रयत शिक्षण संस्थेचे मेरू विद्यामंदिर वाघेश्वर ता.जावली येथे 36 वर्षानंतर पुन्हा भरली माजी वि‌द्यार्थ्यांची शाळा. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   जावली  प्रतिनिधि  शेखर जाधव -----------------------------  रयत शिक्षण संस्थेचे मेरू विद्यामंदिर वाघेश्वर ता. जावली येथिल सन १९८७-१९८८ च्या इयत्ता दहावीच्या विदयार्थ्यांचा स्नेहमेळावा २६ मे २०२४ रोजी वाघेश्वर हायस्कुल मध्ये संपन्न झाला. काळाच्या प्रवाहात निसटलेले मैत्रीचे हात पून्हा हातात आले तब्बल ३६ वर्षांनी शिक्षक विद्यार्थी व मित्र-मैत्रिणींची आगळी वेगळी भेट घडून आली. नियोजन होते स्नेहमेळाव्याचे. त्या बॅचचे सर्व शिक्षक ,नलगे सर,डुबल सर ,पुजारी सर ,शेडगे सर,शेडगे क्लार्क ,पाटील सर,तसेच मेरु विद्या मंदिर वाघेश्वर प्राचार्य जाधव सर,यांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा पार पडला.  या मेळाव्या दरम्यान शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून शाळेला ५१,०००/- हजार रू विद्यार्थी वर्गणीतून देण्यात आले.  दिवंगत शिक्षकांची आठवण म्हणून शाळेच्या आवारात आंब्यांची तसेच वडाच...

श्री शिवाजी विद्यालय रिसोडच्या विद्यार्थ्यांचे सुयश !

Image
 श्री शिवाजी विद्यालय रिसोडच्या विद्यार्थ्यांचे सुयश ! ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  रिसोड(प्रतिनिधी)   रणजीत ठाकूर  -------------------------------  माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 चा निकाल दि.27 मे रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला असून, यामध्ये श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड च्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.   विद्यालयाचा निकाल 98.40%  लागला.  आदित्य जगदीश देशमुख हा 95.20 % गुण मिळवुन प्रथम आला, तर  कु. प्रेक्षिता विश्वनाथ खंडारे 95.00 % द्वितीय,  कु. प्रांजली विनोदराव सरनाईक 94.40 %  ही विद्यार्थीनी तृतीय आली आहे.  उर्दू माध्यमातून कु.आफिया परवीन शेख अशफाक 93.20 % प्रथम,कु.आयशा फिरदोस मकसूद शहा 92.00% द्वितीय, व कु.सबा परविन शेख अकबर 91.40% तृतीय आली आहे. या  विद्यालयातील एकूण 250 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 176 विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. 57 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर 13 विद्यार्थी द्व...

राधानगरी तालूक्यातील बारङवाङी येथे किरकोळ कारणावरून मूलानेच केला आईचा खोरे घालून निर्घून खून.

Image
  राधानगरी तालूक्यातील बारङवाङी येथे किरकोळ कारणावरून मूलानेच केला आईचा  खोरे घालून निर्घून खून. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे --------------------------------   राधानगरी तालूक्यातील बारङवाङी येथे किरकोळ कारणावरूण मूलाने केला आईच्या ङोक्यात  खोरे घालून निर्घून खून केला.. मालूबाई श्रीपती मूसळे वय 70 रा. बारङवाङी तालूका राधानगरी असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी तिचा मूलगा संदीप मूसळे व य 35 याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना आज दूपारी दोन वाजण्याच्या सूमारास सूतार मळा नावाच्या शेतात घङली.   याबाबत पोलिसांच्याकङून मिळालेली माहीती अशी कि,. संदीप मूसळे त्याची आई मालूबाई मूसळे व त्यांचे नातेवाईक हे सूतार मळा नावाच्या शेतात भाताची टोकणी करण्यासाठी शेतीची सापसपाई करण्यासाठी दूपारी गेले होते. यावेळी किरकोळ कारणावरून संदीप मूसळे व तिची आई मालूबाई मूसळे यांच्या वाद झाला. या वादातून संदीप यांने आपल्या आईच्या ङोक्यात खोराचा .मोठा घाव घातला.यामध्ये ती रक्तबंबाळ होऊन...

ट्रकच्या धडकने वारणानगरची महिला ठार राधानगरी येथील घटना.

Image
  ट्रकच्या धडकने वारणानगरची महिला ठार राधानगरी येथील घटना. ------------------------------  फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------  निप्पाणी देवगड राज्यमार्गावर असलेल्या राधानगरी बसस्थानकासमोर ट्रकच्या धडकेत मोटरसायकलवर मागे बसलेली महिला जागीच ठार झाली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी वारणानगर येथून नातेवाईकपर्यटणासाठी आले होते. काळम्मावाडी धरण पाहून  राधानगरी धरण पाहण्यासाठी येत असताना राधानगरी बस स्थानक शेजारी पाणी पिण्यासाठी थांबले होते. त्याच दरम्यान एम. पी .०९.७८०१ या भरधाव ट्रकची  धडक बसल्याने मोटर सायकल नंबर एम.एच.०९ एफ.एच ५८८५ वरील मागे बसलेल्या आसमा समीर सय्यद (वय ३०) रा. वारणानगर ता.पन्हाळा मूळ गाव झाकले. या जागीच ठार झाल्या.ही घटना दुपारी तीन च्या सुमारास घडली. पती समीर सय्यद हे वारणानगर येथे दूध संघात नोकरीस आहेत. त्याना दोन लहान मुले आहेत.  घटनास्थळी राधानगरी पोलीस दाखल झाले व महिलेचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला.  पुढील तपास राधानगरी ...

मिरज कुपवाड महापालिका कडून 30 विनापरवाना कॉफी शॉपना नोटीसा.

Image
  मिरज कुपवाड महापालिका कडून 30 विनापरवाना कॉफी शॉपना नोटीसा. --------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  मिरज कुपवाड प्रतिनिधी  राजू कदम  --------------------------------- महानगरपालिकेकडून 30 विना परवाना कॉफी शॉप ना नोटीस देण्यात येणार आहे. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपासणी विना परवाना कॅफे शॉप ना नोटीस देणार आहेत. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका कडून मनपा क्षेत्रातील कॉफी शॉप चे तपासणी सुरू करण्यात आले आहे. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार शुक्रवारपासून आयुक्त शिल्पा दरेकर व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे दोन दिवसांमध्ये महापालिकेने 30 हून अधिक कॉफी शॉपची तपासणी पूर्ण केले आहे महापालिका प्रशासनाकडून मनपा क्षेत्रातील कॉफी शॉप चे तपासणी मोहीम हाती घेण्यात आले आहे तपासणी मोहिमेला कालपासून सुरुवात झाले आहे तपासणी मोहिमात महापालिकेच्या पथकाने कॉलेज कॉर्नर परिसरातील दोन कॉफी शॉपला भेट देत तेथील ...

पत्रकार केशव गरकळ यांची कन्या कु. पूनम केशव गरकळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश.

Image
  पत्रकार केशव गरकळ यांची कन्या कु. पूनम केशव गरकळ हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश. ---------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र   रिसोड प्रतिनिधी रणजीत ठाकूर. ---------------------------------- .नुकताच अमरावती विद्यापीठाचा इयत्ता दहावीचा निकाल  जाहीर झाला असून रिसोड येथील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. पूनम केशव गरकळ हिने इयत्ता दहावी मध्ये 93.20 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.रिसोड येथील पत्रकार तथा उदयवार्ता न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी केशव गरकळ यांची कन्या कु. पूनम केशव गरकळ हिने रिसोड येथील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातुन इयत्ता दहावीची परीक्षा दिली असून नुकताच अमरावती विद्यापीठाचा दहावीचा निकाल घोषित झाला असून 93.20 टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.पुनम गरकळ हिला मराठी विषयात 85 मार्क, हिंदी संस्कृत 95 मार्क, इंग्रजीमध्ये 88 मार्क, गणित विषयात 98 मार्क, विज्ञान मध्ये 95 मार्क तर समाजशास्त्र या विषयात 90 मार्क घेऊन घवघवीत यश संपादन केले असून एकूण 500 मार्कापैकी 466 म...