2095 वीज ग्राहकांची 'बत्ती गूल'महावितरणने परिमंडलात ल बिले थकल्याने जोडणी केली खंडित.

2095 वीज ग्राहकांची 'बत्ती गूल'महावितरणने परिमंडलात ल बिले थकल्याने जोडणी केली खंडित. ------------------------------- कोल्हापूर. प्रतिनिधी ------------------------------- *कोल्हापूर परिमंडळ 28 फेब्रुवारी 2025 :* वीजबिलांची शंभर टक्के वसुली करण्यासाठी 'महावितरण' नेहमीच प्रयत्नशील असते. वीजबील भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ खंडीत करण्याची मोहीम 'महावितरण'ने हाती घेतली आहे. गेल्या 26 दिवसांत कोल्हापूर परिमंडलातील तब्बल 2 हजार 95 वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 680 तर सांगली जिल्ह्यातील 1415 ग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीसह चालू महिन्याचे वीजबील वसूल करणे 'महावितरण'समोर एक आव्हानच असते. त्यामुळे आर्थिक वर्षातील शेवटच्या दोन महिन्यात 'महावितरण'ने वीजबील वसुलीसाठी ठाम भूमिका घेतली आहे. लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील कोल्हापूर परिमंडलाच्या वीजग्राहकांकडे जानेवारी अखेर 64 कोटी 70 लाख रुपयांची थकबाकी असून फेब्रुवारी महिन्या...