विध्या मंदीर सावर्डी शाळेत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा कार्यक्रम संपन्न.

 विध्या मंदीर सावर्डी शाळेत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा कार्यक्रम संपन्न.

--------------------------------------

शाहुवाडी प्रतिनिधी 

आनंदा तेलवणाकर

मो .9404477703

--------------------------------------

 विद्यार्थ्यांनी ' ढ 'अक्षर छान काढावे परंतू शाळेमध्ये 'ढ' राहू नये असे प्रतिपादन अक्षरमित्र युवराज पचकर यांनी मांडले. तसेच विद्या मंदिर सावर्डी शाळेमध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविता पाटील तर कार्यशाळेचे मार्गदर्शक अक्षरमित्र युवराज पचकर होते.

     सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा निमित्त युवराज पचकर यांनी विद्यार्ध्यांच्या हस्ताक्षरामधील छोट्या - मोठ्या  चुका कशा पद्धतीने सुधारल्या पाहिजेत ते सांगितले. तसेच सुंदर हस्ताक्षरामुळे आपली ओळख कशी निर्माण होते हे ही सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ' ढ 'अक्षर छान काढावे परंतू शाळेमध्ये 'ढ' राहू नये असा कानमंत्र दिला.  या  कार्यशाळेचे नियोजन आरोही पाटील, संध्याराणी गुरव, अबोली कांबळे , कल्याणी कांबळे, देवयानी कांबळे, संचिता गवळी, आराध्या संकपाळ या विद्यार्थीनी पाहिले.या कार्यक्रमासाठी शंकर सोनवणे, शामराव कांबळे, बाबुराव गुरव  तर उज्वला जगताप,अश्विनी सावंत, पायल रवंदे या शिक्षिका उपस्थित होत्या.यावेळी  कल्याणी वसंत कांबळे या विद्यार्थिनीने आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.