*प्रहार जनशक्ती पक्षाचे तासगाव येथील राष्ट्रीय महामार्ग विजापूर गुहागर NH166 येथे शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचा चक्काजाम आंदोलन*
प्रहार जनशक्ती पक्षाचे तासगाव येथील राष्ट्रीय महामार्ग विजापूर गुहागर NH166 येथे शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचा चक्काजाम आंदोलन.
******************************
*मिरज तालुका :- प्रतिनिधी राजू कदम*
*******************************
न्यायहक्कासाठी प्रहारचा एल्गार.
तासगाव: शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना व विधवा महिलांना दरमहा 6000 पेन्शन, कष्टकरी, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार इत्यादींच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चुभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन उभारले आहे.
या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री. सुनील ( भाऊ) सुतार जिल्हा युवक अध्यक्ष ओम भोसले, प्रहार सेवक राहुल कलाल, तासगाव तालुका अध्यक्ष सुधीर पाटील, मिरज तालुका कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष श्रीकांत पवार, मिरज तालुका अध्यक्ष पोपट माने ,युवक अध्यक्ष राजू कदम , खानापूर युवक अध्यक्ष आकाश शिंदे, व इतर शेतकरी मजूर मेंढपाळ बांधव, यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
प्रहारच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरू राहील असा इशारा प्रहार जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सुतार व ओम भोसले प*** माने राजू कदम ,आकाश शिंदे, यांनी दिला. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करणार आहे. आंदोलकांनी घोषणाबाजी करत शासनाच्या निष्क्रिय धोरणांचा निषेध नोंदवला. तासगाव पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Comments
Post a Comment