शेतकऱ्याकडून सक्तीची कर्ज वसुली केल्यास ठोकून काढू माजी आमदार बच्चू कडूनचा इशारा,
शेतकऱ्याकडून सक्तीची कर्ज वसुली केल्यास ठोकून काढू माजी आमदार बच्चू कडूनचा इशारा,
अमरावतीच्या बँक मॅनेजर ला फोनवरून धमकी.
-------------------------
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
---------------------
अमरावती. राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अध्याप सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नसताना दुसरीकडे बँकेकडून सक्तीची वसुली सुरू असल्याने माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले. अमरावतीमध्ये एका बँक मॅनेजरला थेट फोन करून शेतकऱ्याकडून सक्तीची वसुली केली तर तिथेच ठोकून काढू असा इशारा बच्चू कडू यांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील टाकरखेड गावातील एका शेतकऱ्याला बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा व्यवस्थापनाने कोणतीही नोटीस न देता थेट घर अर्जाबाबत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला आत्महत्येचा विचार येईपर्यंत मानसिक त्रास झाला माहिती बच्चू कडू यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट फोन करून मॅनेजरला खडसावले. पेरणीचे दिवस असताना सक्तीने वसूली होत असल्याने शेतकरी संकटात आहे सरकार अजून कर्जमाफी बद्दल काहीही बोलत नाही त्यामुळे उद्या कर्ज माफ झाल्यास बँक पैसे भरून देणार का? असा सवाल भक्ती करू यांनी बँक मॅनेजरला केला तुम्ही जर सक्तीची वसुली केली तर मी सोडणार नाही तुम्हाला वाटत असेल तर मी धमकी दिली म्हणून माझ्या नावाची तक्रार पोलिसात ध्या असे सांगून सक्तीची वसुली करायची नाही जर तुम्ही वसुली करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना घाबरू नका फक्त एक मेसेज करा, असे आवाहनही माजी मंत्री बच्चू कडू यांनी केले. सक्तीची वसुली केल्यास बँक मॅनेजरला त्याच बँकेत टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिला तसेच मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष द्यावे याची मागणी केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी अमरावतीमध्ये आमरण उपोषण केले होते ही बाब शासनाला सुद्धा माहित आहे. बच्चू कडू यांनी याआधी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्राणांतिक उपोषण केले होते. त्यानंतर सरकारने लवकरच समिती घटीत करून कर्जमाफी बाबत निर्णय घेण्याचा आश्वासन दिले होते मात्र त्याच वेळी बँकांनी शेतकऱ्यावर वसुलीसाठी दावा टाकायला सुरुवात केल्याने कडू यांनी संपर्क प्रतिक्रिया दिली आहे.
No comments: