गणेश पार्क मध्ये एक सप्टेंबर कचरा गाडी येणार सरपंच तानाजी पालकर.

 गणेश पार्क मध्ये एक सप्टेंबर कचरा गाडी येणार सरपंच तानाजी पालकर.

-------------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी 

विजय बकरे

-------------------------------------

करवीर तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायत मार्फत गणेश पार्कमध्ये एक सप्टेंबर पासून कचरा गाडी पाठवण्यात येणार असल्याची माहिती पाडळी ग्रामपंचायतचे सरपंच  तानाजी पालकर यांनी शिष्टमंडळाला दिले

पाडळी ग्रामपंचायत हद्दीत गणेश पार्क येत असल्याने त्या गणेश पार्कमध्ये कचरा उठा होत नसल्याने त्या संदर्भात आज सोमवारी गणेश पार्क मधील ग्रामस्थांचे शिष्ट मंडळ पाडळी ग्रामपंचायतीच्या गाव सभेमध्ये निवेदन घेऊन गेले होते त्यावेळी गणेश पार्क मधील ग्रामस्थांनी विविध विषयासंदर्भात चर्चा केली त्यावेळी ग्रामस्थांनी कचरा उठाव व्यावा यासाठी आग्रह धरला त्यावेळी सरपंच व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी एक मताने एक सप्टेंबर पासून गणेश पार्कमध्ये कचरा उठाव साठी गाडीची व्यवस्था केली जाणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले तसे बाकीचे प्रश्न आहेत ते लवकर सोडवली जातील असे आश्वासन दिले

या शिष्टमंडळात विजय बकरे प्रकाश शिंदे सचिन गायकवाड धोंडीराम चव्हाण अमित भोसले सचिन काकडे सौ अर्चना भालेकर सौ प्रियांका पाटील सौ सविता चौगुले सौ मनीषा शिंदे सौ प्रियांका भालेकर सौ अस्मिता पाटील सौ मीना बकरे मनोहर पाटील सौ स्नेहल पवार सौ मनीषा भाटे आशिष ढाले इत्यादी ग्रामस्थ हजर होते

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.