बदलत्या काळानुसार बाप्पाही झाले अँटिक हटके लुक गणेशमूर्तींची वाढली क्रेझ.
बदलत्या काळानुसार बाप्पाही झाले अँटिक हटके लुक गणेशमूर्तींची वाढली क्रेझ.
---------------------------
बाजार भोगाव .
सुदर्शन पाटील
---------------------------
कळे : आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावे आपण इतरांपेक्षा वेगळे हटके असावे अशी विचारसरणी समाजात मोठ्या प्रमाणात रूढ होत असून याचीच प्रचिती गणेशोत्सवामध्ये देखील येत आहे
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असून आगामी गणेशोत्सवामध्ये हटके लूक असणाऱ्या गणेश मूर्तींना मागणी वाढली आहे परिणामी शहरी भागात सोबतच ग्रामीण भागातील कुंभार बांधव सुद्धा विविध रूपातील पारंपारिक गणेश मूर्ती सोबत आकर्षक हटके लुक असणाऱ्या गणेश मूर्ती बनवत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे गणेशोत्सवास काही दिवसांचाच अवधी असल्याने गावागावातील कुंभार वाड्यांमध्ये गणेश मूर्ती बनवण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे गणेश मूर्ती तयार करण्यासाठी कुंभार बांधव रात्र रात्र जागू लागले आहेत
ग्राहकांच्या मागणीनुसार कुंभार बांधवांकडून लहान मोठ्या विविध रूपातील विविध रंगातील गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरू असून काही ग्राहक आपल्या पसंतीची मूर्ती मिळावी या हेतूने आगाऊ पैसे देऊन मूर्ती बुकिंग करत आहेत.
मूर्ती बनवण्यासाठी लागणारा वेळ, लागणारी जागा, कच्या मालाची उपलब्धता, कामगारांचा ताळमेळ याचा विचार करून मोजकेच कुंभार बांधव स्वतः गणेश मूर्ती घडवत आहेत तर बहुतांश कुंभार बांधव हे कोल्हापूरातील बापट कॅम्प सारख्या मोठी बाजारपेठ असणाऱ्या ठिकाणाहून ग्राहकांच्या मागणीनुसार कच्या गणेश मूर्ती खरेदी करून ग्राहकांच्या आवडीने रंगकाम करत आहेत
ठळक मुद्दे
1) पारंपरिक मूर्तीची मागणी कायम
2) दगडूशेठ,लालबाग, चिंतामणी मूर्तींना मागणी जास्त
3) एक ते दोन फूट उंचीच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणावरती विक्री
4) शाडूच्या मूर्तींनी जपलेय वेगळेपण
चौकट
परंपारिक गणेश मूर्ती सोबत नवीन हटके लुक असणाऱ्या मूर्तिना मागणी वाढली असून नवीन छाप,नवीन लुक बनवत असताना, मूर्तितील लहान लहान बारकावे समजून घेताना, रंगसंगती ठरवत असताना अनुभव पणाला लागतो-
मूर्तिकार अक्षय कुंभार वारनूळ
फोटो ओळ काटेभोगावं येथे गणेश मूर्ती वरती अखेरचा हात फिरवताना महिला कुंभार
Comments
Post a Comment