राशिवडे येथे सार्वजनिक 14 गणेश मंडळावर कारवाई करणार पोलीस निरीक्षक संतोष गोरे.
राशिवडे येथे सार्वजनिक 14 गणेश मंडळावर कारवाई करणार पोलीस निरीक्षक संतोष गोरे.
-------------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------------------
राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील सार्वजनिक मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रकाश झोत व डीजे च्या आवाजाचे प्रमाणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 14 सार्वजनिक मंडळावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली
काल गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राशिवडे येथील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन मिरवणुकी मध्ये लेझर लाईट व डीजे आवाज मंडळाने प्रमाणापेक्षा अधिक वाढीवलेला होता डीजे चे ध्वनी नमुने घेतले असून न्यायालयाच्या आदेश नियमाचे उल्लधन केल्याप्रकरणी त्या सार्वजनिक 14 मंडळाच्या वर कारवाई करण्यात येणार असल्याचे राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सांगितले
Comments
Post a Comment