अवघ्या ४ तासांत खुनाचा छडा — जुनाराजवाडा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कौतुकास्पद कामगिरी.

 अवघ्या ४ तासांत खुनाचा छडा — जुनाराजवाडा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कौतुकास्पद कामगिरी.

------------------------------

सलीम शेख

------------------------------

कोल्हापूर: कळंबा आयटीआय मागील हनुमान नगर परिसरात एका घरात लागलेल्या आगीत एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जुनाराजवाडा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचा गळा चिरलेला आढळून आला असून, घरातील साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत होते. त्यामुळे खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

पोलिसांची तत्पर तपास आणि जलद कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजीवकुमार झाडे व निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्वतंत्र पथके तयार करून तपासाला गती दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांच्या सहकार्याने केवळ चार तासांत संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

 वादातून घडलेली घटना  

तपासात उघड झाले की मृत व्यक्ती व आरोपी हे पूर्वीचे ओळखीचे होते. दोघांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले असून, आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या प्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजीवकुमार झाडे, निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक निरीक्षक विशाल पाटोळे, उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकातील अधिकारी व अंमलदारांचा विशेष सहभाग होता.

ही घटना पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.